इथे शारीरिक संबंध आहे पाप, केवळ अपत्यासाठी येतात जवळ; हस्तमैथुन आणि चुंबनावरही आहे बंदी....
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 12:48 IST2023-02-21T12:48:09+5:302023-02-21T12:48:25+5:30
Inis Beag Island : या आयलॅंडचं नाव आहे ‘इनिस बेग’. इथे राहणाऱ्या लोकांनी खूप आधीपासून आयरलॅंडच्या मुख्य प्रवाहापासून आपल्याला वेगळं केलं आहे. पण त्यांची भाषा आयरिशच आहे.

इथे शारीरिक संबंध आहे पाप, केवळ अपत्यासाठी येतात जवळ; हस्तमैथुन आणि चुंबनावरही आहे बंदी....
Inis Beag Island : आयरलॅंड जगातील सगळ्यात सुंदर देशांपैकी एक आहे. या देशात जास्तीत जास्त आयलॅंड आहे. या आयलॅंड वेगवेगळ्या जमातीचे लोक राहतात. त्यांच्या जगण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत आणि परंपरा वेगळ्या आहेत. अशाच एका जमातीबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या जमातीमध्ये संभोगाला पाप मानलं जातं. इथे महिला आणि पुरूष शारीरिक संबंध तेव्हाच ठेवतात जेव्हा त्यांना परिवार वाढवायचा असतो. म्हणजे फक्त मुलांना जन्म देण्यासाठी ते संबंध ठेवतात. एकदा अपत्य झालं तर पुन्हा संबंध ठेवणं योग्य मानत नाहीत.
या आयलॅंडचं नाव आहे ‘इनिस बेग’. इथे राहणाऱ्या लोकांनी खूप आधीपासून आयरलॅंडच्या मुख्य प्रवाहापासून आपल्याला वेगळं केलं आहे. पण त्यांची भाषा आयरिशच आहे. त्यांचं जीवन मुख्यपणे शेती, पशुपालन आणि मासेमारी यावर चालतं. येथील लोक त्यांच्या परंपरांबाबत फार कट्टर आहेत. ते शारीरिक संबंधांना वाईट मानतात. तुम्हाला वाचून धक्का बसेल की, नवविवाहित जोडपं शारीरिक संबंध ठेवताना पूर्णपणे नग्न होत नाहीत. अंगावर काही कपडे ठेवूनच ते संबंध ठेवतात. अंडरगारमेंट काढणं ते योग्य मानत नाहीत.
हस्तमैथुन, चुंबनावर बंदी
इतकंच नाही तर या बेटावर हस्तमैथुन, चुंबन आणि समलैंगिकता यावर बंदी आहे. लग्नाआधी रोमान्स करण्याबाबत कुणी विचारही करू शकत नाही. येथील लोकांची मान्यता आहे की, फिजिकल रिलेशन महिलांसाठी अत्याचारासारखं आहे. मोकळ्यावर शौचास गेले किंवा लघवी केली तर इथे शिक्षा दिली जाते.
नग्न दिसू नये म्हणून आंघोळही करत नाही
तुम्हाला वाचून धक्का बसेल की, लोक नग्न दिसू नये म्हणून ते आंघोळही करत नाहीत. पाण्याने केवळ हात-पाय, चेहरा स्वच्छ करतात. हे नियम समुदायातील लोकांनी तयार केले ज्यांचं पालन सगळेच करतात. जेव्हाही पती पत्नीसोबत संबंध ठेवतो तेव्हा पुढाकार तोच घेतो. संभोगानंतर पती दुसरीकडे जाऊन झोपतो.
मासिक पाळीही महिलांसाठी इथे एक ट्रॉमा आहे. त्या याला एक वेडेपणाचा काळ मानतात. दुसरीकडे पुरूषांचं असं मत आहे की, जास्त फिजिकल रिलेशन ठेवल्याने महिला कमजोर होतील. असं असूनही इथे एकही असा परिवार नाही ज्यांना मुलं नाहीत.