शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

Indian Railway: दे धक्का! बंद पडलेल्या ट्रेनला मजुरांनी धक्का देऊन रुळावरून हटवले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 10:20 AM

Indian Railway: तुम्ही रस्त्यावर बंद पडलेल्या वाहनांना धक्का मारून बाजूला नेताना किंवा सुरू करताना अनेकदा पाहिले असेल. मात्र तुम्ही कधी ट्रेनला धक्का मारताना पाहिले आहे का? मात्र अशीच एक ‘दे धक्का’ घटना समोर आली आहे.

भोपाळ - तुम्ही रस्त्यावर बंद पडलेल्या वाहनांना धक्का मारून बाजूला नेताना किंवा सुरू करताना अनेकदा पाहिले असेल. मात्र तुम्ही कधी ट्रेनला धक्का मारताना पाहिले आहे का? (Indian Railway) मात्र अशीच एक ‘दे धक्का’ घटना समोर आली आहे. मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर बंद पडलेल्या एका रेल्वे निरीक्षण ट्रेनला मजुरांनी धक्का मारून मेन लाईनवरून हटवले. ही घटना मुंबई-हावडा रेल्वे मार्गावरील टिमरनी रेल्वे स्टेशनवर घडली आहे. या रेल्वेमार्गावर गाड्यांची वर्दळ असल्याने ट्रेनमध्ये बिघाड झाल्यावर तिथे उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी इंजिनाची वाट न पाहता ही ट्रेन मुख्य मार्गावरून हटवली. (The train was pushed by workers in Madhya Pradesh)

त्याचे झाले असे की, टिमरनी रेल्वे स्टेशनवरील अप ट्रॅकवर (मुंबई कडून इटारसीकडे जाणारा) ओव्हरहेड लाइन दुरुस्त करणारी ट्रेनमध्ये (टॉवर वॅगन) तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे इन्स्पेक्शन ट्रेन मेन लाईनवर उभी राहिली. तसेच ट्रॅक जॅम झाला. ज्या ट्रॅकवर ही ट्रेन बंद पडली. त्या ट्रॅकवरून मुंबईकडून हावड्याला जाणाऱ्या ट्रेनची वाहतूक होत असते. त्यामुळे ही बंद पडलेली ट्रेन बाजूला करणे आवश्यक बनले.

दरम्यान, बिघाड झालेल्या ट्रेनला बाजूला करण्यासाठी दुसरी ट्रेन येईंपर्यंत खूप उशीर झाला असता. त्यामुळे दुसरी ट्रेन येण्याची वाट न पाहता रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी जवळूनच मजूर बोलावण्याचा निर्णय घेतला. या मजुरांनी धक्के मारून ट्रेनला मेन लाईनवरून बाजूला केले. बिघाड झालेल्या ट्रेनला मेन लाईनवरून लूप लाईनवर आणण्यात आले. दरम्यान मजूर ट्रेनला मेन लाईनवरून हटवत असताना कुणीतरी व्हिडीओ तयार केला.

ट्रेनला धक्के मारून मेन लाईनवरून लूप लाईनवर नेण्याबाबत टिमरनी स्टेशन मास्तर अमिक पाठक यांनी सांगितले की, टॉवर वॅगनमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे ही ट्रेन मेन लाईनवरून हटवण्यात आली. यादरम्यान अप ट्रॅक सुमारे दोन तास बाधित राहिला. तसेच एक ट्रेन टिमरनी स्टेशनवर थांबवून ठेवण्यात आली. दरम्यान, ट्रॅक खाली झाल्यावर ही ट्रेन मार्गस्त करण्यात आली.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेIndian Railwayभारतीय रेल्वेMadhya Pradeshमध्य प्रदेश