रेल्वेत मिळणाऱ्या एका पाण्याच्या बाटलीची नेमकी किंमत किती, २० रूपये मागितले तर तक्रार कुठे कराल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 13:13 IST2026-02-23T13:12:19+5:302026-02-23T13:13:29+5:30

Indian Railway Complaint Process: रेल्वेत विकल्या जाणाऱ्या पाण्याच्या बॉटलची नेमकी किंमत किती आणि जास्त पैसे घेतले तर कुठे तक्रार कराल?

Indian Railway Complaint Process: If someone selling water bottle in train for 20 rupees where I can complain | रेल्वेत मिळणाऱ्या एका पाण्याच्या बाटलीची नेमकी किंमत किती, २० रूपये मागितले तर तक्रार कुठे कराल?

रेल्वेत मिळणाऱ्या एका पाण्याच्या बाटलीची नेमकी किंमत किती, २० रूपये मागितले तर तक्रार कुठे कराल?

Indian Railway Complaint Process: रेल्वेने प्रवास करताना आपण पाहिलं असेल की, वेगवेगळ्या गोष्टी विकणारे लोक अधून-मधून फेऱ्या मारत असतात. यांमध्ये पाण्याच्या बॉटल विकणारे लोक देखील असतात. रेल्वे प्रवासादरम्यान बरेच लोक पाण्याच्या बॉटल्स विकत घेतात. पाणी विकत घ्यायला काहीच अडचण नाही. पण मुख्य अडचण ही असते की, पाणी विकणारे लोक रेल्वेने ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा जास्त पैसे घेतात. प्रवाशांसाठी ही डोकेदुखी ठरते. अनेकदा यावरून वादही होतात. पण पाणी हवं असल्याने नाईलाजाने त्यांना जास्त पैसे देऊन पाणी घ्यावं लागतं. आपल्याला सुद्धा अशा स्थितीचा कधीना कधी सामना करावा लागला असेल. अशात आपल्याला हे माहीत असलं पाहिजे की, या गोष्टीची कुठे आणि कशी तक्रार करावी.

पाण्याच्या बॉटलची ठरलेली किंमत किती?

भारतीय रेल्वेकडून रेल्वेत विकल्या जाणाऱ्या किंवा स्टेशनवर विकल्या जाणाऱ्या पाण्याच्या बॉटलची किंमत ही १४ रूपये ठरवण्यात आली आहे. ही किंमत १ लीटरच्या बॉटलसाठी आहे. आधी एका बॉटलसाठी १५ रूपये किंमत ठरवण्यात आली होती. नंतर ती एक रूपयाने कमी केली. तेच अर्धा लीटर पाण्याच्या बॉटलसाठी ९ रूपये ठरवण्यात आले आहे. या किंमतीचं पालन करणं अनिवार्य आहे. पण जर यापेक्षा जास्त पैसे घेतले गेले तर हे नियमाचं उल्लंघन आहे.

रेल्वेत कितीला विकली जाते पाण्याची बॉटल?

अनेकदा प्रवाशांना ही तक्रार असते की, रेल्वेत पाण्याची बॉटल १४ रूपयांपेक्षा अधिक किंमतीत विकली जाते. यासाठी जास्तीत जास्त लोकांकडून २० रूपये घेतले जातात. अशात प्रवाशांनी सतर्क राहणं आवश्यक आहे. असा काही प्रकार घडला तर याची तक्रार केली पाहिजे, जेणेकरून अशा गोष्टींना आळा बसेल.

कुठे कराल तक्रार?

रेल्वेत जर पाण्याच्या बॉटलसाठी आपल्याकडून जास्त पैसे घेतले जात असतील, याबाबत आपण दोन ठिकाणी तक्रार करू शकता.

१) रेल्वे हेल्पलाईन नंबर १३९

आपण भारतीय रेल्वेच्या १३९ या हेल्पलाईन नंबरवर फोन करून तक्रार दाखल करू शकता. इथे आपली तक्रार लगेच घेतली जाईल आणि योग्य ती कारवाई केली जाईल.

२) IRCTC वेबसाईट

आपण भारतीय रेल्वेच्या IRCTC या अधिकृत वेबसाईटवर आपली तक्रार नोंदवू शकता. या वेबसाईटवर आपल्याला एक तक्रार करण्यासाठी एक फॉर्म मिळेल, ज्यात आपण तक्रार दाखल करू शकता.

Web Title : रेलवे में पानी की बोतल पर ज़्यादा दाम? शिकायत यहाँ करें!

Web Summary : रेलवे ने 1 लीटर पानी की बोतल का दाम ₹14 तय किया है। ज़्यादा पैसे लिए जा रहे हैं? 139 पर कॉल करें या IRCTC वेबसाइट पर शिकायत दर्ज करें।

Web Title : Railway Water Bottle Price Gouging? Here's How to Complain!

Web Summary : Railways set ₹14 for 1-liter water bottles. Overcharged? Dial 139 or lodge a complaint on the IRCTC website. Know your rights, report exploitation.