बोंबला! समुद्राच्या मधोमध जहाजावर सुरू होती पार्टी, 'तो' पाय घसरून खाली पाण्यात पडला आणि....

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2020 11:09 IST2020-12-10T11:06:13+5:302020-12-10T11:09:10+5:30

राजवीरही या पार्टीला आला होता. पार्टी सुरू असताना तो पाय घसरून Yacht वरून खाली पाण्यात पडला.

Indian man in Dubai falls off yacht swims to shore | बोंबला! समुद्राच्या मधोमध जहाजावर सुरू होती पार्टी, 'तो' पाय घसरून खाली पाण्यात पडला आणि....

बोंबला! समुद्राच्या मधोमध जहाजावर सुरू होती पार्टी, 'तो' पाय घसरून खाली पाण्यात पडला आणि....

(Image For Representation/tripadvisor.com)

ही धक्कादायक आणि तेवढीच प्रेरणादायी घटना आहे दुबईतील. इथे एक भारतीय तरूण त्याच्या मित्राच्या बर्थडेसाठी पार्टीत आला होता. पार्टी समुद्राच्या मधोमध एका Yacht वर सुरू होती. आता झालं असं की, हा तरूण या जहाजावरून पार्टीदरम्यान खाली पाण्यात पडला. पार्टी सुरूच होती. कुणालाच कळालं नाही की, तो खाली पाण्यात पडलाय. 

इंडिया टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, या तरूणाचं नाव राजवीर आहे. त्याच्या मित्राने बर्थडे पार्टी करण्यासाठी एक Yacht भाड्याने घेतलं होतं. यावर जोरदार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. राजवीरही या पार्टीला आला होता. पार्टी सुरू असताना तो पाय घसरून Yacht वरून खाली पाण्यात पडला.

२७ वर्षीय राजवीरने पाण्यात पडल्यावर मदतीसाठी अनेकदा आवाज दिले. पण त्याचा काही फायदा झाला नाही. त्याचा आवाज कुणालाही ऐकू आला नाही. Yacht पुढे निघून गेलं. अशात राजवीरने विचार केला की, तो Yacht वर दिसला नाही तर त्याला शोधायला लोक येतील. पण तसं काही झालं नाही.

राजवीरने सांगितले की, 'मी जहाजातून खाली पडल्यावर त्यांना आवाज दिला. पण माझा आवाज पोहोचलाच नाही. ते माझ्यापासून दूर गेले होते. मला वाटलं होतं की, कुणाच्यातरी लक्षात येईल आणि मला बघायला ते परत येतील'. दरम्यान राजवीर हा काही प्रोफेशनल स्वीमर नाही. पण तरी त्याने स्वत:च जीव वाचवण्यासाठी स्वीमिंग सुरू केलं.

हळूहळू अंधार वाढत होता. राजवीरने स्वीमिंग करणं योग्य समजलं. त्याला हे माहीत नव्हतं की, तो कुठे आहे आणि कोणत्या दिशेने जातो. त्याने फक्त जीव वाचवण्यासाठी स्वीमिंग सुरू केलं. तो २ तास सतत स्वीमिंग करत होता. नंतर त्याला बुर्ज अल अरबचे लाइट्स दिसले. त्याने सांगितले की, 'मी नेहमीच सर्वायवल शो बघत होतो. मला हे माहीत होतं की, मी सर्वाइव करणार. मी स्वत:ला हिंमत दिली आणि स्वीमिगं सुरू केलं'. अखेर राजवीर किनाऱ्यावर पोहोचला.
 

Web Title: Indian man in Dubai falls off yacht swims to shore