'व्हॅलेंटाइन डे'ला पतीनं लॉटरीचं तिकीट दिलं म्हणून पत्नी झाली नाराज, पण त्यामुळंच जिंकले 10 कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 11:34 IST2022-02-23T11:32:09+5:302022-02-23T11:34:45+5:30

Virginia man gifts wife winning $10M lottery ticket for Valentine's Day : व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने प्रत्येकजण आपल्या जोडीदाराला खास भेटवस्तू देतो. त्यात फुले, चॉकलेट, टेडी आदींचा समावेश आहे. मात्र मारियाच्या पतीने तिला लॉटरीचे तिकीट गिफ्ट दिले होते.

Husband shocks wife with a $10 MILLION winning scratch-off lottery ticket for Valentine's Day | 'व्हॅलेंटाइन डे'ला पतीनं लॉटरीचं तिकीट दिलं म्हणून पत्नी झाली नाराज, पण त्यामुळंच जिंकले 10 कोटी

'व्हॅलेंटाइन डे'ला पतीनं लॉटरीचं तिकीट दिलं म्हणून पत्नी झाली नाराज, पण त्यामुळंच जिंकले 10 कोटी

कुणाचे नशीब कधी बदलेल, हे सांगता येत नाही. असेच काहीसे हेमार्केटमधील एका महिलेच्या बाबतीत घडले आहे. हेमार्केटमध्ये राहणाऱ्या मारिया चिकासला (Maria Chicas) तिच्या पतीने व्हॅलेंटाईन डेनिमित्त लॉटरीचे तिकीट गिफ्ट म्हणून दिले होते. दरम्यान, व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने प्रत्येकजण आपल्या जोडीदाराला खास भेटवस्तू देतो. त्यात फुले, चॉकलेट, टेडी आदींचा समावेश आहे. मात्र मारियाच्या पतीने तिला लॉटरीचे तिकीट गिफ्ट दिले होते.
 
व्हॅलेंटाईन डेच्या खास प्रसंगी पतीकडून गिफ्ट म्हणून लॉटरीचे तिकीट मिळाल्याने मारियाला आनंद झाला नाही, तर तिला पतीचा राग आला. त्यावेळी मारियाला तो कागदाचा तुकडा वाटत होता, कारण याआधीही तिच्या पतीने लॉटरीचे तिकीट काढले होते. पण पतीला कधीही लॉटरी लागली नाही. पतीने मारियाला लॉटरी गिफ्ट दिल्यावर ती खूप नाराज झाली होती, मात्र आता त्याच तिकीटामुळे दोघांचेही नशीब बदलले आहे.

पतीने दिलेल्या लॉटरीच्या तिकिटातून 10 कोटी रुपये जिंकल्याने मारियाचा आनंद आता गगनाला भिडला आहे. जेव्हा लॉटरी लागली आणि बक्षिसाची रक्कम समोर आली, तेव्हा तिच्या पतीलाही विश्वास बसला नाही. मात्र, नंतर दोघांनाही खूप आनंद झाला. दरम्यान, मारियाने व्हर्जिनिया लॉटरीचे तिकीट (Virginia Lottery ticket) जिंकले, ज्याची रक्कम 10 कोटी रुपये होती.

मारियाने सांगितले की, जेव्हा तिला लॉटरी लागली तेव्हा तिचा विश्वास बसत नव्हता. याबाबतची माहिती तिच्या पतीने तिला दिली. याबाबत पतीने सांगितल्यावर मारियाला पती आपल्याला खोटे बोलत असल्याचे सांगितले. पण, खरोखर लॉटरी जिंकल्याचे कळल्यानंतर तिचा आनंदाला पारावार राहिला नाही. दरम्यान, व्हॅलेंटाईन डेच्या काही दिवस आधी तिच्या पतीने हे लॉटरीचे तिकीट मानससमधील 9103 मॅथिस एव्हेन्यू येथील इन अँड आउट मार्टमधून खरेदी केले होते, असे मारियाने सांगितले. 

Web Title: Husband shocks wife with a $10 MILLION winning scratch-off lottery ticket for Valentine's Day