पत्नी वर्षातून केवळ तीन वेळाच देते संबंध ठेवण्याची परवानगी, वैतागलेल्या पतीने सांगितलं दु:खं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 11:57 IST2022-02-07T11:57:10+5:302022-02-07T11:57:27+5:30

UK : त्याची पत्नी त्याला केवळ तिचा बर्थडे, लग्नाचा वाढदिवस आणि इतरवेळी एकदा अशाप्रकारे वर्षातून केवळ तीन वेळाच संबंध ठेवण्याची परवानगी देते.

Husband says my wife allows me only three times for intercourse in a year | पत्नी वर्षातून केवळ तीन वेळाच देते संबंध ठेवण्याची परवानगी, वैतागलेल्या पतीने सांगितलं दु:खं

पत्नी वर्षातून केवळ तीन वेळाच देते संबंध ठेवण्याची परवानगी, वैतागलेल्या पतीने सांगितलं दु:खं

यूनायटेड किंगडममधून UK) एक आश्चर्यजनक घटना समोर आली आहे. इथे एका व्यक्तीने सांगितलं की, तो त्याच्या पत्नीला फारच वैतागलाय.  कारण ती रोमान्स करण्यात कंजूशी करते. तो म्हणाला की, त्याची पत्नी त्याला वर्षातून केवळ ३ वेळा संबंध ठेवण्याची परवानगी देते.

द सनच्या एका रिपोर्टनुसार, व्यक्तीने सांगितलं की, त्याची पत्नी त्याला केवळ तिचा बर्थडे, लग्नाचा वाढदिवस आणि इतरवेळी एकदा अशाप्रकारे वर्षातून केवळ तीन वेळाच संबंध ठेवण्याची परवानगी देते. त्याला हे समजत नाही की, त्याची पत्नी प्रेमात इतकी कंजूशी का करते?

या व्यक्तीने सांगितलं की, यावर्षी त्याच्या पत्नीसोबत एकदाच संबंध ठेवले आहेत. पुढे आणखी दोन वेळा तो असं करू शकणार आहे. आता तो या चिंतेत राहतो की, आता त्याच्याकडे केवळ दोनच संधी बाकी आहेत. त्याने सांगितलं की, त्याचं वय ३७ वर्षे आहे आणि त्याच्या पत्नीचं वय ३४ वर्षे आहे. त्याच्या लग्नाला ७ वर्षे झाली आहेत. त्यांना ६ वर्षांची एक मुलगीही आहे. पण दोघांमध्ये सगळं काही ठीक नाही.

तो म्हणाला की, त्याची पत्नी मूडी आहे. जेव्हाही तो तिच्यासोबत संबंध ठेवण्याबाबत बोलतो तेव्हा ती नाराज होते. त्याने अनेकदा आपल्या पत्नीला समजावण्याचा प्रयत्न केला. पण ती काही ऐकायला तयार नाही.

तो पुढे म्हणाला की, आता तो त्याच्या पत्नीसोबत जास्त बोलत नाही. घरात काही आणायचं असेल किंवा मुलीला शाळेत सोडायचं असेल फक्त यावरच ते एकमेकांशी बोलतात. आपल्या मुलीने सिंगल पॅरेंटसोबत वाढावं असं त्यांना वाटत नाही. त्यामुळे तो पत्नीसोबतचं नातं तोडू शकत नाही. पण तो या गोष्टीने फारच चिंतेत आहे की, त्याला वर्षातून केवळ ३ वेळा पत्नीसोबत संबंध ठेवण्याची परवानगी मिळते.
 

Web Title: Husband says my wife allows me only three times for intercourse in a year