पत्नीला पळवण्याचा घेतला असा सूड, आता पत्नीच्या प्रियकराच्या बायकोसोबत केलं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 11:06 IST2023-02-27T11:03:27+5:302023-02-27T11:06:56+5:30

Love Story : नीरजने आधी तर मुकेश विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. पण जेव्हा न्याय मिळाला नाही तेव्हा त्याने स्वत: मुकेशचा सूड घेण्याचा विचार केला.

Husband married with wife's lover wife in Khagaria Bihar | पत्नीला पळवण्याचा घेतला असा सूड, आता पत्नीच्या प्रियकराच्या बायकोसोबत केलं लग्न

पत्नीला पळवण्याचा घेतला असा सूड, आता पत्नीच्या प्रियकराच्या बायकोसोबत केलं लग्न

Love Story :  सध्या सगळीकडे लग्नाचा सीझन सुरू आहे. सोशल मीडियावर लग्नांचे व्हिडीओ आणि लग्नासंबंधी किस्से समोर येत असतात. कधी नवरी लग्नातून फरार झाल्याच्या बातम्या येतात तर कधी नवरदेव. सध्या बिहारच्या खगडियामध्ये एका लग्नाची जास्त चर्चा होत आहे. एकाच्या पत्नीला पळवून नेलं म्हणून दुसऱ्यानेही त्याच्या पत्नीला पळवून नेऊन सूड घेतला. या घटनेमुळे सगळेच हैराण झाले आहेत.

पसराहा भागात राहणारा मुकेश चौथम भागात राहणाऱ्या नीरजची पत्नी रूबीच्या प्रेमात पडला. त्यानंतर तो त्याच्या पत्नीला गेल्यावर्षी 2022 फेब्रुवारीमध्ये घेऊन पळाला आणि त्यांनी लग्न केलं. 

नीरजने आधी तर मुकेश विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. पण जेव्हा न्याय मिळाला नाही तेव्हा त्याने स्वत: सूड घेण्याचा विचार केला. नीरजने मुकेशच्या पत्नीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढत गेल्या 18 फेब्रुवारीला तिला घेऊन पळाला. 

त्यानंतर दोघांनी मंदिरात लग्न केलं. या घटनेतील इंटरेस्टिंग बाब म्हणजे मुकेशला चार मुलं आहेत आणि नीरजला दोन. मुकेश घर सोडताना तीन मुलांना सोबत घेऊन गेला होता. तेच नीरजकडे मुकेशचं एक मूल आणि त्याची दो मुलं व त्याची पत्नी आहे.

अशाप्रकारे दोन्ही परिवारात तीन-तीन मुलं आहेत. दोघांच्या पत्नींचं  नाव रूबी देवी आहे. नीरजने सांगितलं की, तो आता आनंदी आहे. नीरज म्हणाला की, तो हरदिया गावचा राहणार आहे आणि त्याचं लग्न 2009 मध्ये झालं होतं. अशात त्याची पत्नी मुकेशच्या प्रेमात पडली होती. ज्यानंतर फेब्रुवारी 2022 मध्ये मुकेश त्याच्या पत्नीला घेऊन पळाला होता. यावर्षी नीरज मुकेशच्या पत्नीला घेऊन पळाला.

Web Title: Husband married with wife's lover wife in Khagaria Bihar