पत्नीचं वाढलं वजन म्हणून पतीने दिला घटस्फोट, महिलेने पोलिसांकडे केली न्यायाची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2022 17:35 IST2022-09-02T17:34:04+5:302022-09-02T17:35:15+5:30
Divorce : महिलेने सांगितलं की, नोटीस मिळाल्यानंतर तिने पतीसोबत बोलण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पतीने उत्तर दिलं की, तू लठ्ठ झाली आहेस आणि मी तुला घटस्फोट देत आहे.

पत्नीचं वाढलं वजन म्हणून पतीने दिला घटस्फोट, महिलेने पोलिसांकडे केली न्यायाची मागणी
Divorce : उत्तर प्रदेशच्या मेरठमधून घटस्फोटाची एक अजब घटना समोर आली आहे. इथे एका महिलेने सांगितलं की, ती लठ्ठ झाल्याने पतीने तिला घटस्फोट दिला. महिलेने सांगितलं की, तिला सतत जास्त वजनामुळे टोमणे मारले जात होते. जाकिर कॉलनीतील नजमा म्हणाली की, पतीने घटस्फोट दिला. तिचा गुन्हा इतकाच होता की, ती लठ्ठ झाली होती. पती केवळ याच कारणाने पत्नीली घटस्फोटाची नोटीस पाठवली. पीडितेचे आरोप आहे की, पतीने तिला घटस्फोटाची नोटीस पाठवली. महिलेने सांगितलं की, नोटीस मिळाल्यानंतर तिने पतीसोबत बोलण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पतीने उत्तर दिलं की, तू लठ्ठ झाली आहेस आणि मी तुला घटस्फोट देत आहे.
पतीचं हे मत ऐकल्यानंतर पत्नी पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि तिने न्यायाची मागणी केली. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, जर कुणी अशाप्रकारचं कारण देऊन नातं संपवलं असेल तर त्याची चौकशी केली जाईल. नजमाने सांगितलं की, तिचं लग्न 8 वर्षाआधी सलमानसोबत झालं होतं.
महिलेने सांगितलं की, त्यांना एक मुलगाही आहे. नजमाने आरोप करत सांगितलं की, 1 महिन्याआधी सलमानने तिला घरी जाण्यास सांगितलं होतं आणि घटस्फोटाची नोटीस पाठवली होती. जेव्हा तिने घटस्फोटाचं कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा पती सलमान याने तिला स्पष्ट सांगितलं की, तू लठ्ठ झाली आहे आणि मी तुला घटस्फोट देत आहे.
पीडितेने सांगितलं की, फोन करून तिने पतीला नोटीसबाबत विचारणा करण्याचा प्रयत्न केला. पण तिच्या पतीने फोन कट केला. ज्यानंतर तिने अनेकदा त्याला फोन करण्याचा प्रयत्न केला. पण तिच्या पतीने फोन उचलला नाही. तेव्हा नजमा रात्रीच तिच्या परिवारासोबत पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि न्यायाची मागणी केली.