'या' शहरात सगळेच कोट्याधीश, शहर बघण्यासाठी गर्दी करतात परदेशी पर्यटक!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 12:11 PM2018-12-29T12:11:05+5:302018-12-29T12:14:04+5:30

आज कोणत्याही शहरात किंवा जागात गेलं तर श्रीमंत आणि गरीब अशी दरी बघायला मिळते. ही दरी दिवसेंदिवस वाढतानाही दिसते आहे.

Huaxi this is the richest village in the world | 'या' शहरात सगळेच कोट्याधीश, शहर बघण्यासाठी गर्दी करतात परदेशी पर्यटक!

'या' शहरात सगळेच कोट्याधीश, शहर बघण्यासाठी गर्दी करतात परदेशी पर्यटक!

googlenewsNext

आज कोणत्याही शहरात किंवा जागात गेलं तर श्रीमंत आणि गरीब अशी दरी बघायला मिळते. ही दरी दिवसेंदिवस वाढतानाही दिसते आहे. जगाच्या पाठीवर एक असंही शहर आहे जिथे राहणारी सगळीच लोकं कोट्याधीश आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या गावातील प्रत्येक घरात एक हेलिकॉप्टरही आहे. या शहरातील लोक कुठेही जाण्या-येण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करतात. 

हे शहर चीनमध्ये आहे. हू असी (Huaxi) असं या शहराचं नाव असून जगातलं हे अशाप्रकारचं एकच शहर आहे. आणि हे शहर जगभरात आपल्या श्रीमंतीसाठी ओळखलं जातं. या शहरातील प्रत्येक व्यक्तीसोबत एकसमान व्यवहार केला जातो. जगातलं हे असं पहिलं शहर आहे जे पूर्णपणे मॉडल आणि सोशलिस्ट आहे. हे शहर १९६१ मध्ये वू रेनबाओ नावाच्या एका नेत्याने वसवलं होतं. 

वू रेनबाओ येथील लोकांना चांगला रोजगार देण्यासाठी फर्टिलायजर स्प्रे कॅनची फॅक्टरी सुरु केली होती. ही फॅक्टरी सुरु झाल्यावर अनेक बेरोजगारांना काम मिळालं. या कंपनीला पुढे चालून फार फायदा झाला. यातून मिळालेल्या पैशांचा वापर वू रेनबाओ यांनी शहराच्या विकासासाठी केला. आता या शहरात अनेक कंपन्या आहेत. आणि शहरातील लोक या कंपन्यांमध्ये भागधारक आहेत.

असे सांगतिले जाते की, आता या शहरातील प्रत्येक व्यक्तीच्या खात्यात १.५ कोटी रुपये आहे. एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी हे लोक हेलिकॉप्टर आणि टॅक्सीचा वापर करतात. आता येथील लक्झरी लाइफस्टाइल बघण्यासाठी दुसऱ्या देशातील लोकही येतात. 

या शहरात अमेरिकेतील स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध ऑपरा हाऊसही तयार करण्यात आलं आहे. त्यामुळे हे शहर आणखी आकर्षक आणि सुंदर दिसतं. इथे राहणाऱ्या लोकांना जोपर्यंत ते इथे आहेत तोपर्यंत कंपनीकडून सर्वच सुविधा दिल्या जातात. जेव्हा त्यांना दुसरीकडे जायचं असतं तेव्हा सगळी संपत्ती इथेच सोडून जावं लागतं. 

Web Title: Huaxi this is the richest village in the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.