समुद्री जहाजांना एक किलोमीटर अंतर पार करायला किती खर्च येतो, कोणत्या इंधनाचा वापर होतो?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 16:52 IST2026-02-12T16:51:00+5:302026-02-12T16:52:21+5:30

Ship Fuel Consumption : गाड्यांच्या मायलेजपेक्षा भव्य कार्गो जहाजांच्या मायलेजचा विषय जरा वेगळा आणि किचकट असतो. तोच आपण समजून घेणार आहोत.

How much fuel does a ship consume and the cost per kilometer, which fuel use in it | समुद्री जहाजांना एक किलोमीटर अंतर पार करायला किती खर्च येतो, कोणत्या इंधनाचा वापर होतो?

समुद्री जहाजांना एक किलोमीटर अंतर पार करायला किती खर्च येतो, कोणत्या इंधनाचा वापर होतो?

Ship Fuel Consumption : एखादी नवीन म्हणा किंवा सेकंड हँड गाडी घ्यायचा विषय निघाला की, सगळ्यात आधी विचार केला जातो, तो मायलेजचा. म्हणजे १ लीटर इंधनात गाडी किती किलोमीटर धावणार याचं प्रमाण. हाच विषय जेव्हा समुद्र पार करणाऱ्या भव्य कार्गो जहाजांचा येतो, तेव्हा मात्र सगळा हिशोब बदलून जातो. म्हणजे इथे एका लीटर इंधनात जहाज किती किलोमीटर अंतर पार करतं, याऐवजी ते १ किलोमीटरमध्ये किती इंधन जाळतं? असा मुद्दा महत्वाचा ठरतो. तेच आज आपण जाणून घेणार आहोत.

एका मोठ्या कंटेनर जहाजाचा मायलेज किती?

आपण मोठाले कंटेनर वाहून नेणारे भव्य कार्गो जहाजाचे व्हिडीओ नक्कीच पाहिले असतील. हे हळूहळू समुद्राच्या लाटांना कापत पुढे पुढे सरकत असतात. तर जवळपास ३५० ते ४०० मीटर लांब एक सामान्य मोठं कंटेनर जहाज साधारण २०० ते २५० लीटर फ्यूल जाळू शकतं. रोज हे जहाज स्पीज आणि लोडच्या आधारावर १५० ते २५० टन इंधन जाळतात. हे जहाज सामान्यपणे २० ते २४ नॉटच्या क्रूजिंग स्पीडवर चालतात. सोबतच स्पीडमध्ये थोडा जरी बदल झाला तर इंधनाचा वापरही जास्त होतो.

जहाजात पेट्रोल वापरतात की डिझेल?

आपल्यालाही प्रश्न पडला असेल की, जहाजात पेट्रोलचा वापर होतो की डिझेलचा? तर गाड्यांच्या उलट जहाजांमध्ये खास समुद्री इंधन वेरी लो सल्फर फ्यूल ऑइल किंवा हेवी फ्यूल ऑइलचा वापर केला जातो. या इंधनाला सामान्यपणे बंकर फ्यूल नावानेही ओळखलं जातं. हे फ्यूल रेग्युलर डिझेलपेक्षा अधिक घट्ट आणि जड असतं. हे खासकरून समुद्री इंजिनासाठी डिझाइन केलं गेलं आहे. ग्लोबल एनव्हायर्नमेंटचे नियम कठोर झाल्यावर अनेक जहाज हे सल्फर एमिशन कमी करण्यासाठी वेरी लो सल्फर फ्यूल ऑइलचा वापर करू लागले आहेत.

१ किलोमीटरसाठी किती खर्च येतो?

या जहाजांसाठी वापरल्या जाणाऱ्या समुद्री ऑइलच्या किंमती ग्लोबल तेल मार्केटच्या आधारावर खाली - वर होत असतात. सरासरी समुद्री फ्यूलची किंमत जवळपास ६०० ते ८०० डॉलर प्रति टन असते. म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात जवळपास ५०००० ते ६५००० रूपये प्रति टन असते. जर एक मोठं जहाज प्रति किलोमीटर जवळपास २५० लीटर फ्यूलचा वापर करत असेल तर फ्यूलची किंमत आणि कार्यक्षमतेच्या आधारावर प्रति किलोमीटर फ्यूलची किंमत १५००० ते २०००० रूपयांदरम्यान असू शकते.

इंधनाच्या वापरात फरक का असतो?

एका जहाजाला किती इंधन लागणार याचं प्रमाण काही ठरलेलं नसतं. यात कार्गोची साइज आणि वजन एक मोठी भूमिका बजावतं. जास्त लोड असलेल्या जहाजाच्या इंजिनवर जास्त दबाव पडतो आणि इंधनाचा वापरही अधिक होतो. यासोबतच स्पीड सुद्धा एक महत्वाचा भाग आहे. जसाही जहाजाचा स्पीड वाढतो, इंधन अधिक जाळलं जातं.

Web Title : समुद्री जहाजों का ईंधन: एक किलोमीटर की लागत और ईंधन का प्रकार

Web Summary : बड़े मालवाहक जहाज प्रति किलोमीटर 200-250 लीटर ईंधन की खपत करते हैं। वे बंकर ईंधन, एक भारी तेल का उपयोग करते हैं। माल के वजन और गति से प्रभावित होकर, प्रति किलोमीटर लागत ₹15,000-₹20,000 तक होती है। ईंधन की खपत इन कारकों पर निर्भर करती है।

Web Title : Ship Fuel Consumption: Cost and Fuel Type for One Kilometer

Web Summary : Large cargo ships consume 200-250 liters of fuel per kilometer. They use bunker fuel, a heavy oil. Cost per kilometer ranges from ₹15,000-₹20,000, influenced by cargo weight and speed. Fuel consumption varies based on these factors.