रेल्वेच्या एका चाकाचं वजन किती माहितीये का? उत्तर वाचून मोठ्या धुरंधरालाही फुटेल घाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 16:01 IST2026-01-22T15:59:51+5:302026-01-22T16:01:57+5:30

Interesting Facts About Train : रेल्वेच्या चाकाबाबत अशीच एक वेगळी आणि इंटरेस्टिंग बाब आम्ही आपल्याला सांगणार आहोत.

How much does a train wheel weigh? Check details | रेल्वेच्या एका चाकाचं वजन किती माहितीये का? उत्तर वाचून मोठ्या धुरंधरालाही फुटेल घाम

रेल्वेच्या एका चाकाचं वजन किती माहितीये का? उत्तर वाचून मोठ्या धुरंधरालाही फुटेल घाम

Interesting Facts About Train : भारतीय रेल्वे आता आधीच्या तुलनेत खूप जास्त हायटेक होत आहे. नवीन रेल्वे, नवीन मार्ग, नवीन सुविधा अधिक वाढल्या आहेत. ज्यामुळे लोकांचा प्रवास सुखकर होतोय. डिजिटल सेवांचा वापर अधिक वाढतोय. वेगवेगळ्या गोष्टींसाठी रेल्वे विभागाच्या नावावर अनेक रेकॉर्ड नोंदवले गेले आहेत. रेल्वेच्या अनेक इंटरेस्टिंग गोष्टी लोकांना नेहमीच जाणून घेण्याची उत्सुकता असते. अशा कितीतरी गोष्टी असतात ज्या सर्वसामान्य लोकांना माहीत नसतात. रेल्वेच्या चाकाबाबत अशीच एक वेगळी आणि इंटरेस्टिंग बाब आम्ही आपल्याला सांगणार आहोत. ती म्हणजे भारतीय रेल्वेच्या चाकाचं वजन किती असतं आणि ते कुठे - कसे तयार केले जातात.

रेल्वेची चाकं कुठे तयार केली जातात?

भारतात रेल्वेची चाकं मुख्यपणे बंगळुरूच्या आणि बिहारच्या सारण जिल्ह्याच्या बेला रेल व्हील प्लांटमध्ये बनवले जातात. या दोन्ही ठिकाणाहून भारतीय रेल्वेला चाकं पुरवली जातात. त्याशिवाय तामिळनाडूमध्येही चाकं बनवली जातात. बंगळुरूतील कारखाना हा असा एकमेव कारखाना आहे जिथे, चाकं, चेसिस आणि पूर्ण व्हील सेट बनवले जातात.

रेल्वेच्या चाकाचं वजन किती?

रेल्वेच्या चाकांच्या वजन हे रेल्वेच्या प्रकारानुसार आणि वापरानुसार वेगवेगळं असतं. स्टील अथॉरिटी इंडिया लिमिटेडनुसार, रेल्वेच्या एका चाकाचं वजन ३२६ किलो ते ५५४ किलोपर्यंत असू शकतं. तर सामान्य कोचच्या एका चाकाचं वजन हे ३८४ किलो आणि डिझेल इंजिनच्या चाकाचं ५२८ किलो असतं. खास बाब ही आहे की, इंजिनाची चाकं पू्र्ण रेल्वे खेचण्यासाठी जास्त मजबूत आणि जड बनवले जातात. त्यामुळे ते डब्याच्या चाकांच्या वजनापेक्षा जास्त जड असतात. चाकांची सुरक्ष फार गरजेची असते. त्यामुळे ते दर ३० दिवसांनी चेक केले जातात आणि काही बिघाड असेल तर लगेच बदलले जातात.

किती दिवसांनी बदलतात रेल्वेची चाकं?

रेल्वेची चाकं सामान्यपणे दर ३ ते ४ वर्षांनी किंवा ७० हजार ते १ लाख किलोमीटर धावल्यानंतर बदलले जातात. पण हे रेल्वेचा प्रकार आणि नियमित चेकींगवर अवलंबून असतं. ज्यामुळे दर ३० दिवसांनी चाकांची चेकींग केली जाते. मालगाड्यांची चाकं हे ८ ते १० वर्षात बदलली जातात.

Web Title : ट्रेन के पहिये का वजन: जानकर हैरान हो जाएंगे विशेषज्ञ भी

Web Summary : भारतीय रेलवे के पहिए, बेंगलुरु और बिहार में बनते हैं, जिनका वजन ट्रेन के प्रकार के आधार पर 326 से 554 किलो तक होता है। नियमित जांच से सुरक्षा सुनिश्चित होती है, और हर 3-4 साल या 70,000-100,000 किमी पर इन्हें बदला जाता है।

Web Title : Train Wheel Weight: Facts That Will Surprise Even Experts

Web Summary : Indian Railways' wheels, made in Bengaluru and Bihar, vary in weight from 326 to 554 kg based on the train type. Regular checks ensure safety, with replacements every 3-4 years or 70,000-100,000 km.