सांगा पाहू 'या' फोटोत किती प्राणी आहेत? १० पैकी ९ जणांनी दिलं चुकीचं उत्तर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 20:54 IST2022-03-29T20:52:54+5:302022-03-29T20:54:13+5:30

जर तुम्हाला वाटत असेल की तुमची नजर तीक्ष्ण आहे. तर तुम्ही हे चित्र पाहून उत्तर द्या. तुम्हाला फक्त या चित्रात लपलेले प्राणी शोधायचे आहेत. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सांगू शकाल का? 10 पैकी 9 लोक अचूक उत्तर देण्यात अपयशी ठरले आहेत.

how many animals are there in this picture 9 out of 10 people have failed to tell | सांगा पाहू 'या' फोटोत किती प्राणी आहेत? १० पैकी ९ जणांनी दिलं चुकीचं उत्तर!

सांगा पाहू 'या' फोटोत किती प्राणी आहेत? १० पैकी ९ जणांनी दिलं चुकीचं उत्तर!

इंटरनेटवर सध्या एक चित्र मोठ्या प्रमाणावर शेअर केलं जात आहे. या चित्रात अनेक प्राणी लपलेले आहेत. लोक योग्य उत्तर देऊ शकत नाहीत. जर तुम्हाला वाटत असेल की तुमची नजर तीक्ष्ण आहे तर तुम्ही हे चित्र पाहून उत्तर द्या. तुम्हाला फक्त या चित्रात लपलेले प्राणी शोधायचे आहेत आणि त्यांची नावं सांगायची आहेत. लक्षवेधी बाब अशी की १० पैकी ९ लोक याचं अचूक उत्तर देण्यात अपयशी ठरतात. पण तुम्ही स्वत:ला अपयशांच्या यादीत पकडण्याची गरज नाही. तुम्ही नक्कीच याचं अचूक उत्तर देऊ शकता. 

खालील चित्रातील एकूण प्राणी शोधा


काय मग किती प्राणी शोधले? हत्ती, घोडा, मांजर... आणखी कुणी दिसतंय का? तुम्हाला जर यापेक्षा अधिक प्राणी सापडत नसतील तर चिंता नको. फक्त काळजीपूर्वक पाहा.

हे आहे अचूक उत्तर..


आता तुम्हाला उत्तर तर मिळालं असेलच. तर या चित्रात एकूण १६ प्राणी लपलेले आहेत. हो, हे खरं आहे. यामध्ये डास आणि सापांचाही समावेश आहे. ते पाहण्यासाठी तुम्हाला थोडं झूम करावं लागेल. आता तुम्हाला उत्तर मिळालं असेल. हे चित्र तुमच्या मित्रांसह सोशल मीडियावर शेअर करा आणि त्यांनाही थोडं डोकॅलिटीचा वापर करु द्या!

Web Title: how many animals are there in this picture 9 out of 10 people have failed to tell