पाणी न पिताही मनुष्य किती दिवस जिवंत राहू शकतो? पाहा कसा एक एक दिवसाचा पडतो प्रभाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 17:54 IST2026-03-16T17:53:43+5:302026-03-16T17:54:14+5:30
Interesting Facts : अनेकदा लोकांच्या मनात असा प्रश्न पडतो की, एखादी व्यक्ती पाण्याशिवाय किती दिवस जिवंत राहू शकते. चला जाणून घेऊ या प्रश्नाचं उत्तर...

पाणी न पिताही मनुष्य किती दिवस जिवंत राहू शकतो? पाहा कसा एक एक दिवसाचा पडतो प्रभाव
Interesting Facts : पाणी हे प्रत्येक प्राण्यासाठी जीवन आहे. आपल्या शरीराचा साधारण ६० ते ७० टक्के भाग हा पाण्यापासून बनलेला आहे. शरीरातील अनेक महत्वाची कामे यावरच अवलंबून असतात. पाण्याने केवळ शरीराची भागते असं नाही तर पाण्याने शरीराचं तापमान कंट्रोल राहतं, कोशिका सक्रिय राहतात आणि जैविक प्रक्रियांमध्येही महत्वाची भूमिका निभावतं. अशात अनेकदा लोकांच्या मनात असा प्रश्न पडतो की, एखादी व्यक्ती पाण्याशिवाय किती दिवस जिवंत राहू शकते. चला जाणून घेऊ या प्रश्नाचं उत्तर...
पाण्याशिवाय मनुष्य किती दिवस जगू शकतो?
मेडिकल सायन्सनुसार, एक हेल्दी व्यक्ती पाण्याशिवाय सामान्यपणे ३ ते ७ दिवसांपर्यंत जिवंत राहू शकते. अनेक केसेसमध्ये शरीरावर पाण्याच्या कमतरतेचा प्रभाव बघायला मिळतो आणि ३ ते ५ दिवसांच्या आतच स्थिती गंभीर होऊ शकते. जर शरीराला जास्त दिवस पाणी मिळालं नाही तर डिहायड्रेशनची समस्या वाढू लागते आणि हळूहळू शरीरातील अवयव डॅमेज होऊ लागतात.
शरीरात पाणी झाल्यावर काय होतं?
जर एखाद्या व्यक्तीने पाणी पिणं बंद केलं तर शरीर हळूहळू डिहायड्रेट होऊ लागतं. पहिल्या दिवशी व्यक्ती मोठी तहान लागते आणि तोंड कोरडं पडतं. दुसऱ्या दिवशी डोकेदुखी, चक्कर, कमजोरी आणि थकवा यांसारख्या गोष्टी जाणवतात. तिसऱ्या दिवशी शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवर प्रभाव पडू लागतो. किडनी बरोबर काम करत नाही. शरीरातील तरल पदार्थ घाम आणि लघवीद्वारे बाहेर पडतात. ज्यामुळे रक्त घट्ट होऊ लागतं आणि शरीरातील ऑक्सीजनचा पुरवठा प्रभावित होतो. जास्त दिवस हेच सुरू राहिलं तर अनेक अवयव डॅमेज होऊ लागतात.
शरीराला रोज किती पाणी हवं असतं?
एक्सपर्टनुसार, शरीराला रोज पुरेसं पाणी मिळणं गरजेचं असतं. सामान्यपणे पुरूषांना दिवसातून साधारण ३.५ लीटर आणि महिलांना साधारण २.५ लीटर पाण्याची गरज असते. पण हे प्रमाण प्रत्येक व्यक्तीचं वय, वजन, फिजिकल अॅक्टिविटी, खाणं-पिणं आणि वातावरण यावर अवलंबून असतं. जर एखादी व्यक्ती भरपूर पाणी असलेल्या भाज्या आणि फळं खात असेल तर त्याला पाणी कमी लागू शकतं. उन्हाळ्यात शरीराला जास्त पाणी हवं असतं, कारण या दिवसात घाम जास्त जात असल्याने शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं.