शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

रेल्वेचा पीएनआर नंबर कसा तयार होतो आणि यातील आकड्यांमध्ये काय दडलेलं असतं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 12:07 IST

PNR Number : तिकीट बुक केल्यावर तुम्हाला एक १० अंकी पीएनआर नंबर मिळतो. पीएनआर नंबर मिळतो हे सगळ्यांनाच माहीत असतं. पण त्यातील गुपित माहीत नसतं.

PNR Number : भारतात लाखो लोक रोज रेल्वेनं प्रवास करतात. रेल्वेचा प्रवास वेळ वाचवणारा, कमी खर्चीक आणि आरामदायक असतो. तुम्हीही अनेकदा रेल्वेनं प्रवास केला असेल. तिकीट बुक केल्यावर तुम्हाला एक १० अंकी पीएनआर नंबर मिळतो. पीएनआर नंबर मिळतो हे सगळ्यांनाच माहीत असतं. पण त्यातील गुपित माहीत नसतं. हा एक यूनिक नंबर असतो. ज्याचा अर्थ होतो पॅसेंजर नेम रेकॉर्ड. या नंबरमध्ये तुमच्या प्रवासासंबंधी सगळी माहीत दडलेली असते. पीएनआर नंबरच्या माध्यमातून प्रवाशाचं नाव, रेल्वे नंबर, सीट नंबर, प्रवासाची तारीख इत्याही माहिती मिळवता येते.

कसा तयार होतो पीएनआर नंबर?

पीएनआर नंबर कसा तयार होतो? असा प्रश्न तुम्हालाही अनेकदा पडला असेल. हा यूनिक नंबर कसा तयार होतो, हे अनेकांना माहीत नसतं. तेच आज आपण जाणून घेणार आहोत. हा नंबर प्रवाशासाठी एकप्रकारे ओळखपत्रच असतो. तिकिटावर हा नंबर असतो, त्यामुळे प्रवासादरम्यान प्रवाशांना डिजिटल किंवा फिजिकल तिकीट दाखवायचं असतं.

रेल्वे झोननुसार नंबरांचं विभाजन

पीएनआर नंबर १० अंकांचा असतो. जो तीन भागांमध्ये विभागलेला असतो. ज्यात पहिले तीन अंक हे दाखवतात की, तिकीट कोणत्या रेल्वे स्टेशनहून जारी केलं आहे. यात उत्तर रेल्वेसाठी १ ते ३, दक्षिण रेल्वेसाठी ४ ते ६ आणि पूर्व रेल्वेसाठी ७ ते ९ नंबर आहेत.

त्यानंतर शिल्लक राहिलेले ७ नंबर कॉम्प्यूटर सिस्टीम जनरेट यूनिक आयडेंटिफिकेशन नंबर असतात. ज्यात प्रवासाची तारीख, वेळ इत्यादी माहिती दडलेली असते.

पीएनआर नंबरमध्ये छापलेल्या माहितीमध्ये प्रवाशाचं नाव, वय, रेल्वेचं नाव, रेल्वेचा नंबर, वेळ, तिकीट कन्फर्म आहे की नाही याची माहिती, कोच आणि सीटची माहिती असते. 

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सIndian Railwayभारतीय रेल्वेJara hatkeजरा हटके