'गाडीचं टायर हवेत कसं उडवायचं ?' उद्योगपती हर्ष गोएंकांनी शेअर केला व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 17:20 IST2021-10-07T17:19:14+5:302021-10-07T17:20:24+5:30
Harsh Goenka Tweet: उद्योगपती हर्ष गोएंका सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असून, ते नेहमीच विविध व्हिडिओ शेअर करत असतात.

'गाडीचं टायर हवेत कसं उडवायचं ?' उद्योगपती हर्ष गोएंकांनी शेअर केला व्हिडिओ
उद्योगपती हर्ष गोएंका सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहेत. ते नेहमीच आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर विविध व्हिडिओ शेअर करत असतात. आताही त्यांनी आपल्या ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीदेखील आश्चर्यचकीत व्हाल. या व्हिडिओमध्ये दोन मुलं दिसत आहेत, जे समुद्राच्या किनारी असलेल्या एका खड्ड्यात टायर टाकत आहेत.
How to have a blast with a tyre pic.twitter.com/Xz1C0YqL6H
— Harsh Goenka (@hvgoenka) October 6, 2021
तुम्हाला वाटेल की, खड्ड्यात टायर टाकणे काय विशेष आहे. पण, हर्ष गोएंका यांनी शेअर केलेला व्हिडिओ विनोदी वाटत असला तरी, तो तितकाच धक्कादायक आहे. या व्हिडिओमध्ये दोन मुले समुद्राच्या किनाऱ्यावर असलेल्या एका मोठ्या खड्ड्यात टायर टाकत आहेत. हे टायर त्यात टाकताच समुद्रातील पाण्याच्या दबावाने ते टायर उंच हवेत उडाना दिसत आहेत.
हा व्हिडिओ खूपच धक्कादायक असून, तो पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. हा व्हिडिओ शेअर करताना हर्ष गोयनका यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, 'टायरचा विस्फोट कसा करावा.' 12 सेकंदांचा हा व्हिडीओ सुमारे 30 हजार वेळा पाहिला गेला आहे, तर एक हजाराहून अधिक लोकांनी त्याला लाइक केलं आहे. या व्हिडिओवर युझर विविध कमेंटदेखील करत आहेत.