शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

Pub G विसरा.. ह्या नव्या गेम ने घातलाय धुमाकूळ, एका दिवसात ६ करोड लोकं खेळतायेत...

By अमित इंगोले | Published: October 13, 2020 11:32 AM

ही कोणत्या सिनेमाची कथा नक्कीच नाही. हा एका गेमचा प्लॉट आहे. या गेमचं नाव आहे Among Us. पबजी गेम बंद झाल्यापासून या गेमची चांगलीच चर्चा रंगली आहे.

१० अ‍ॅस्ट्रोनॉट एका स्पेस मिशनवर जातात. पण अंतराळ यानात १० लोकांमध्ये एक भोंदूही आहे. जो हे मिशन फेल करण्यासाठी आलाय. स्पेसशिपवर पुन्हा पुन्हा काहीना काही समस्या होत आहेत. एका पाठोपाठ एक अ‍ॅस्ट्रोनॉट मरत आहेत. आता क्रू मेंबर्सकडे केवळ दोन पर्याय शिल्लक आहेत. एक म्हणजे स्वत:ला जीव वाचवत मिशन पूर्ण करा नाही तर त्यांच्यातील भोंदू माणसाला ओळखून त्याला बाहेर फेका.

ही कोणत्या सिनेमाची कथा नक्कीच नाही. हा एका गेमचा प्लॉट आहे. या गेमचं नाव आहे Among Us. पबजी गेम बंद झाल्यापासून या गेमची चांगलीच चर्चा रंगली आहे. हा नक्कीच पबजीसारखा हाय-फाय गेम नाही. याचे ग्राफिक्सही सामान्य आहेत. पण हा गेम हा कोणत्याही स्वस्त फोनवर चांगला चालतो. 

ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये झाला सर्वात जास्त डाऊनलोड

Among Us हा काही नवा गेम नाही. २०१८ मध्ये हा गेम तयार केला आहे. Among Us गेमची क्रेझ यावर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबर दरम्यान खूप वाढलली. त्याआधी सगळे गेमर पबजीच्या नादात अढकले होते. पण आता हा गेम भारतासह अमेरिका, मेक्सिको आणि साउथ कोरियातही लोकप्रियता मिळवत आहे. गूगल प्ले स्टोरवर हा गेम टॉपवर आहे. सेन्सर टॉवर नावाची एक एजन्सी आहे जी मोबाइल अॅप्लिकेशनच्या डाऊनलोड नंबरवर लक्ष ठेवून असते. त्यांनी सांगितले की, अ‍ॅन्ड्रॉइड आणि आयफोन मिळून हा गेम आतापर्यंत ८.६ कोटींपेक्षा जास्त वेळा डाऊनलोड झाला आहे. 

काय आहेत गेमचे नियम?

गेममध्ये दोन भाग आहेत. एक म्हणजे क्रू आणि दुसरा म्हणजे भोंदू. क्रू आपले टास्क पूर्ण करतो. भोंदू व्यक्तीने काही गडबड केलेली ठीक करतात. आपला साथीदार मिळाला तर रिपोर्ट करणे आणि कुणावर संशय आला तर मिटींग बोलवणे. क्रू अ‍ॅडमिन रूममध्ये लावण्यात आलेला लाइव्ह मॅप आणि सिक्युरिटी रूममध्ये असलेल्या सीसीटीव्ही फुटेज बघूनही भोंदूचा शोध घेऊ शकतात.

भोंदू व्यक्तीचं काम असतं की, त्याने क्रू मेंबर्ससोबत मिळून-मिसळून रहावं. टास्क करण्याचं नाटक करावं. जेणेकरून कुणाला त्याच्यावर संशय येऊ नये. स्पेस शिपमध्ये अडचणी निर्माण करणे आणि एकटा फिरत असलेल्या क्रू मेंबरला जीवे मारणे. भोंदू हेच करून दुसऱ्या ठिकाणावर जाऊ शकतो. गेमला सुरूवात झाल्यावर सिस्टीम आपोआप एका प्लेअरला इंम्पोस्टर म्हणजे भोंदू बनवू शकतो. 

हा गेम तुम्ही मित्रांसोबत वाय-फायच्या मदतीने खेळू शकता. किंवा ऑनलाइन रूम तयार करूनही खेळू शकता. ऑनलाइन मोडवर तुम्ही जगातल्या लोकांसोबतही हा गेम खेळू शकता. तसेच प्रायव्हेट गेम लावून मित्रांसोबत खेळू शकता. गेमचा होस्ट गेममधील नियम बदलू शकतो. जसे की, डिस्कशनचा वेळ, वोटिंगचा वेळ, प्लेअरची स्पीड इत्यादी. इंपोस्टर हेही ठरवू शकतो की, खेळात किती इंपोस्टर असावे. १० लोकांपैकी जास्तीत जास्त ३ इंपोस्टर होऊ शकतात.

मजेदार टप्पा

गेममध्ये बोलण्याची परवानगी नाही. माइकचाही वापर होत नाही. जे काही सांगायचंय ते लिहून सांगावं लागतं. तेही तेव्हा जेव्हा क्रू मेंबरची डेडबॉडी सापडे किंवा इमरजन्सी मीटींग होते. तेव्हाच इंपोस्टर कोण आहे याचं डिस्कक्शन सुरू होतं. 

गेम लोकप्रिय होण्याचं गुपित

Among Us या गेम इतका डाऊनलोड होण्याचं कारण कोरोना सांगितलं जात आहे. मित्रांसोबत नाक्यावर बसून गप्पा तर करता येत नाही. त्यामुळे एकत्र हा गेम खेळता येऊ शकतो. दुसरं कारण म्हणजे गेम स्ट्रीम करणारे लोक आहेत. हे लोक दिवस-रात्र हा गेम खेळत आहे आणि त्याचं स्ट्रीमिंग दाखवत आहेत.

गेममध्ये काय कमतरता आहे?

या गेममध्ये जर पबजी किंवा कॉल ऑफ ड्यूटीसारखा बोलण्याचा पर्याय असता तर डिस्कक्शनवेळी अडचण झाली असती. सगळे एकमेकांशी बोलले असते तर काहीच समजलं नसतं.  त्यामुळे Among Us मध्ये काही बोलण्यासाठी टायपिंगचा पर्याय आहे. पण यात अनेकदा अडचण येते. 

Among Us किती स्टेज आहेत?

या गेममध्ये एकूण तीन स्टेज आहेत आणि प्रत्येक स्टेजमध्ये वेगवेगळे टास्क आहेत. पण जे जास्त गेम खेळत आहे ते नंतर कंटाळत आहेत. कारण पुन्हा पुन्हा सारखेच टास्क बदलून मिळत आहेत. गेमला नवे टास्क जोडण्याची गरज आहे. सोबतच नवीन स्टेजही. 

टॅग्स :technologyतंत्रज्ञानMobileमोबाइलJara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया