एका जमातीमध्ये वेदनादायी कुप्रथा, परिवारात कुणाचं निधन झाल्यास कापली जातात महिलेची बोटं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 14:36 IST2024-12-13T14:35:04+5:302024-12-13T14:36:47+5:30
डानी जमातीच्या लोकांमध्येही अशीच एक परंपरा आहे. या जमातीमध्ये जर परिवारात कुणाचा मृत्यू झाल्यावर अजब प्रथा पाळली जाते.

एका जमातीमध्ये वेदनादायी कुप्रथा, परिवारात कुणाचं निधन झाल्यास कापली जातात महिलेची बोटं!
Dani Tribe Rituals: जगाच्या वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या लोकांमध्ये वेगवेगळ्या मान्यता आणि रिती-रिवाज आहेत. ते अनेक परंपरा वर्षानुवर्षे पाळत आले आहेत. पण अशाही काही अजब आणि धक्कादायक परंपरा आहेत, ज्या मानवतेला काळिमा फासतात. इंडोनेशियातील जयाविजया प्रांतात राहणाऱ्या डानी जमातीच्या लोकांमध्येही अशीच एक परंपरा आहे. या जमातीमध्ये जर परिवारात कुणाचा मृत्यू झाल्यावर अजब प्रथा पाळली जाते. या प्रथेनुसार, मृत व्यक्तीच्या परिवारातील महिलेची बोटं कापली जातात. ही प्रथा इंडोनेशिया सरकारने बेकायदेशीर घोषित केली आहे. या प्रथेवर सरकारने काही वर्षाआधी बंदी घातली असेल, पण आजही अनेक महिलांच्या हातांची बोटं या प्रथेची कहाणी सांगतात.
डानी जमातीतील वेदनादायी प्रथा
डानी जमातीमधील या अजब प्रथेला इकिपालिन म्हणतात. या परंपरेनुसार, जेव्हाही परिवारातील एखाद्या व्यक्तीचं निधन होतं तेव्हा त्या परिवारातील महिलेला आपलं एक बोट कापावं लागतं. म्हणजे घरात जेवढे निधन होतील, महिलेच्या हातातील बोटं कापली जातील.
दु:खं वाटून घेण्याची पद्धत
या कुप्रथेनुसार, जेव्हा परिवारातील एखाद्या महिला सदस्याचं निधन होतं, तेव्हा परिवारातील एका दुसऱ्या महिलेला या दु:खात सहभागी व्हावं लागतं. या रिती-रिवाजात महिलेचं हाताचं बोटं कुऱ्हाडीने कापलं जातं. असं करण्याआधी महिलेचं बोट दोरीने बांधलं जातं, जेणेकरून रक्तप्रवाह रोखला जावा. त्यानंतर बोट कापलं जातं.
का कापलं जातं महिलेचं बोट?
या लोकांमध्ये अशी मान्यता आहे की, बोट कापून मृत व्यक्तीला स्मरलं जातं आणि त्यांच्या आत्म्याला शांती दिली जाते. अनेक लोक असंही मानतात की, असं केल्याने मृत व्यक्तीची आत्मा वाईट नजरांपासून बचावतो. मृत व्यक्तीप्रति प्रेम व्यक्ती करण्याची ही एक पद्धत आहे.
मानवतेला काळिमा फासणारी प्रथा
इंडोनेशियाच्या डानी जमातीमध्ये प्रचलित बोटं कापण्याची ही प्रथा मानवतेला काळिमा फासणारी प्रथा आहे. ही वेदनादायी तर आहेच, सोबतच क्रूरही आहे. काही वर्षांआधीच इंडोनेशिया सरकार आणि मानवाधिकार संघटनांनी या अमानवीय प्रथेवर बंदी घातली आहे.