पतीने केला पत्नीचा भांडाफोड, म्हणाला - पत्नीने मैत्रिणीसोबत अन् तिच्या पतीसोबत ठेवले संबंध

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2021 15:22 IST2021-06-16T15:21:51+5:302021-06-16T15:22:11+5:30

'द सन' मध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, पीडित पतीचं वय ४० वर्षे आहे तर त्याची पत्नी ३८ वर्षांची आहे. या व्यक्तीने सांगितलं की, त्याचे त्याच्या पत्नीसोबत चांगले संबंध होते.

hHusband says my wife slept with her friend and her husband how am I trust her | पतीने केला पत्नीचा भांडाफोड, म्हणाला - पत्नीने मैत्रिणीसोबत अन् तिच्या पतीसोबत ठेवले संबंध

पतीने केला पत्नीचा भांडाफोड, म्हणाला - पत्नीने मैत्रिणीसोबत अन् तिच्या पतीसोबत ठेवले संबंध

लंडन शहरातून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे एका व्यक्तीला हे समजल्यावर धक्का बसला की, त्याच्या पत्नीने तिच्या महिला मैत्रीणीसोबत आणि तिच्या पतीसोबत शारीरिक संबंध ठेवला. या व्यक्तीला संशय तेव्हा आला जेव्हा त्याला बाथरूममध्ये प्रेग्नेन्सी टेस्ट कीट आढळून आली. त्याला प्रश्न पडला की, त्याने नसबंदी केलेली असताना त्याच्या पत्नीला ही टेस्ट कीट वापरण्याची गरज का पडावी?

पत्नीने मान्य केला गुन्हा

'द सन' मध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, पीडित पतीचं वय ४० वर्षे आहे तर त्याची पत्नी ३८ वर्षांची आहे. या व्यक्तीने सांगितलं की, त्याचे त्याच्या पत्नीसोबत चांगले संबंध होते. त्याचा तिच्यावर खूप विश्वास होता. पण पत्नीने हे मान्य केलं की, तिने तिच्या मैत्रिणीसोबत आणि तिच्या पतीसोबत शारीरिक संबंध ठेवले, तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकली.

पीडित पुरूषाने सांगितलं की, त्याची पत्नी त्याला नेहमी सांगत होते की, तिला एखाद्या महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवायचा आहे. पण त्यावेळी त्याला वाटलं की, ही केवळ तिची कल्पना असेल. पण त्याला याची जराही कल्पना नव्हती की, ती याबाबत इतकी पुढे निघून जाईल.

महिलेच्या पतीने सांगितलं की, त्याची पत्नी सायकलिंगचं कारण देत बराच वेळ घरातून बाहेर राहत होती आणि यादरम्यानच तिने त्याला दगा दिला. तिने तिच्या मैत्रिणीसोबत आणि तिच्या पतीसोबत संबंध ठेवले.

असा झाला भांडाफोड

जेव्हा या व्यक्तीने पत्नीला विचारले की, तू मला दगा दिलास का? तर पत्नीने तिची चूक मान्य केली. पत्नीने आधी सांगितलं की, तिने केवळ तिच्या महिला मैत्रिणीसोबत संबंध ठेवले होते. पण व्यक्तीने जेव्हा तिला सगळं खरं सांगण्यास सांगितलं तेव्हा ती म्हणाली की, तिने तिच्या मैत्रिणीच्या पतीसोबत शारीरिक संबंध ठेवले आहे. पीडित व्यक्तीने सांगितलं की, आता तो त्याच्या पत्नीवर कधीच विश्वास ठेवू शकणार नाही.
 

Web Title: hHusband says my wife slept with her friend and her husband how am I trust her