अहो आश्चर्यम, डोळ्यात घातला नेल ग्लु अन् झालं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2021 18:34 IST2021-06-22T18:33:48+5:302021-06-22T18:34:24+5:30

काहीजण आयुष्यात काय प्रताप करतील हे सांगता येत नाही. विशेष म्हणजे हे प्रताप केल्यावर त्याचे परिणाम भयानक होतात. काही जणांना तर हे ठाऊकही असतं पण तरीही काहीजण ऐकतच नाहीत.

Hey surprise, something like nail glue in my eye ... | अहो आश्चर्यम, डोळ्यात घातला नेल ग्लु अन् झालं असं काही...

अहो आश्चर्यम, डोळ्यात घातला नेल ग्लु अन् झालं असं काही...

काहीजण आयुष्यात काय प्रताप करतील हे सांगता येत नाही. विशेष म्हणजे हे प्रताप केल्यावर त्याचे परिणाम भयानक होतात. काही जणांना तर हे ठाऊकही असतं पण तरीही काहीजण ऐकतच नाहीत. काहीच दिवसांपूर्वी एका माकडीनीने आपल्या संपूर्ण अंगाला ग्लु लावला होता. त्याचे परिणाम काही असे झाले की तिची सर्जरी करून तिचा ग्लु आणि चिकटलेले केस वेगळे करावे लागले.अशीच एक कॅटी बेथ. ही मुळची युके मधील. हिने आपल्या डोळ्यात नेलपॉलिशचा ग्लु घातला. त्यानंकर त्याचे दुष्परिणाम तिला भोगावे लागले.
त्याचं झालं असं की कॅटी एक वेबसिरीज पाहत होती. तेव्हा तिने हा ग्लु तिच्या उजव्या डोळ्यामध्ये घातला. कॅटीचे आयड्रॉप असलेली बाटली आणि ग्लुची बाटली सारखी दिसत होती. वेबसिरीज बघता बघता कॅटीने ग्लुची बाटली उचलली आणि ती डोळ्यात घातली.

तिचे डोळे जळजळायला लागले. तरीही तिने त्या बाटलीतून पुन्हा एक ड्रॉप डोळ्यात घातला. ज्यावेळी तिच्या डोळ्याची जळजळ वाढली आणि तिने चेक केले तेव्हा तिला समजले की ही नेल ग्लुची बाटली आहे जी तिने डोळ्यात घातली. ती धावतच किचनमध्ये गेली व डोळ्यांवर पाणी मारले.
तरीही तिची जळजळ काही कमी होईना. ती शेजाऱ्यांकडे गेली. शेजाऱ्यांनी त्वरित तिला रुग्णालयात हलवले. तिथे डॉक्टरही हा प्रकार पाहुन अवाक् झाले. त्यांच्या करिअरमध्ये त्यांनी हा प्रकार पहिल्यांदा पाहिला होता. ते जास्त काही करू शकत नव्हते. त्यांनी गरम पाण्यात भिजवलेल्या कापसाच्या बोळ्याने डोळ्यातील ग्लु साफ केला.
कॅटी सांगते की ज्यादिवशी तिने ग्लु डोळ्यात घातला ती रात्र अत्यंत भयंकर होती. थोडासा ग्लु अजूनही तिच्या पापण्यांना चिकटलेला होता. तिच्या डोळ्यात जळजळ होत होती. इतकेच नव्हे तर तिचा डोळा लाल होऊन सुजला देखील होता.
 

Web Title: Hey surprise, something like nail glue in my eye ...