मृतदेह कबरेत ठेवण्यासाठी इथे महिन्याला द्यावं लागतं भाडं, भाडं नाही दिलं तर....
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2022 13:37 IST2022-10-26T13:37:28+5:302022-10-26T13:37:58+5:30
इथे सार्वजनिक बसला लोक 'चिकन बस' असं म्हणतात. कारण या बसमध्ये त्यांच्यासोबतच मोठ्या प्रमाणात बकऱ्या आणि कोंबड्याही वाहून नेल्या जातात.

मृतदेह कबरेत ठेवण्यासाठी इथे महिन्याला द्यावं लागतं भाडं, भाडं नाही दिलं तर....
जगात असे अनेक देश आहेत, जिथे फारच विचित्र नियम आणि कायदे असतात. असाच एक देश म्हणजे ग्वातेमाला. हा सुंदर देश एकेकाळी गृहयुद्धाच्या आगीत पेटला होता. मात्र, तरिही येथील लोक सतत हसतमुख आणि आनंदी असतात.
एका रिपोर्टनुसार, जगात सर्वात जास्त हत्त्या ग्वातेमाला येथे होतात. तरी सुद्धा हॅपीनेस इंडेक्सबाबतीत १.६६ कोटी लोकसंख्या असलेला हा देश १०० देशांच्या यादीत असल्याचे सांगितले जाते.
इथे सार्वजनिक बसला लोक 'चिकन बस' असं म्हणतात. कारण या बसमध्ये त्यांच्यासोबतच मोठ्या प्रमाणात बकऱ्या आणि कोंबड्याही वाहून नेल्या जातात.
ग्वातेमालातील सर्वात विचित्र नियम म्हणजे इथे मृतांना कबरेत ठेवण्यासाठी दर महिन्याला भाडं द्यावं लागतं. ज्या परिवारातील व्यक्तीची कबर असते, ते व्यक्ती जर एखाद्या महिन्यात भाडं देऊ शकले नाहीत तर मृतदेह कबरेतून बाहेर काढून ठेवला जातो. आणि त्याजागी दुसऱ्या व्यक्तीचा मृतदेह ठेवला जातो.
असे असले तरी सरकारने शहराच्या बाहेर एक स्मशानभूमी तयार केली आहे. इथे त्या मृतदेहांना दफन केलं जातं, ज्यांचे परिवार दर महिन्याला कबरेचं भाडं देऊ शकत नाहीत.