Video : भर लग्नात नवरदेवाने केला 'तिचा' भांडफोड; असा व्हिडीओ दाखवला की सगळे बघतच राहिले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 13:40 IST2020-03-18T12:59:48+5:302020-03-18T13:40:12+5:30
नवरीचा दुसऱ्या व्यक्तीसोबतचा शारीरिक संबंधाचा व्हिडीओ नवरदेवाने सर्वांसमोर स्क्रीनवर दाखवला अन् एकच गोंधळ उडाला.

Video : भर लग्नात नवरदेवाने केला 'तिचा' भांडफोड; असा व्हिडीओ दाखवला की सगळे बघतच राहिले!
काही दिवसांपासून चीनमधील एका लग्नाचा व्हिडीओ तेथील सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. यात भर लग्नात नवरदेवाने नवरीचा भांडाफोड केलाय. नवरीचा दुसऱ्या व्यक्तीसोबतचा शारीरिक संबंधाचा व्हिडीओ नवरदेवाने सर्वांसमोर स्क्रीनवर दाखवला अन् एकच गोंधळ उडाला.
सोशल मीडियात तीन व्हिडीओ व्हायरल झाले असून एका व्हिडीओ नवरी नवरदेव स्टेजवर येताना दिसतात, त्यानंतर एका दुसऱ्या क्लिपमध्ये नवरी नवरदेवाच्या भावासोबत म्हणजे दीरासोबत रूममध्ये दिसतेय. या महिलेचे तिच्या बहिणीच्या पत्नीसोबतही संबंध होते.
लग्नात सर्वांसमोर नवरीचा खाजगी व्हिडीओ लावल्याने नवरी आणि नवरदेवात कडाक्याचं भांडण झालं. इतकं की, नातेवाईंकांनी दोघांना वेगळं केलं. पण तोपर्यंत अनेकांनी व्हिडीओ रेकॉर्ड केले होते.
Apple Daily च्या वृत्तानुसार, हे कपल गेल्या दोन वर्षांपासून सोबत होतं. नंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. या महिलेच्या होणाऱ्या पतीने घरातील रूममध्ये सिक्रेट कॅमेरा लावला होता. त्यातून हे सगळं समोर आलं.
या घटनेनंतर महिलेने तिच्या आधीच्या प्रियकराला हे व्हिडीओ इंटरनेटवरून काढण्यास सांगितले. पण तोपर्यंत लोकांनी व्हिडीओ डाऊनलोड केले होते. त्यानंतर हे व्हिडीओ WeChat आणि Twitter वरही व्हायरल झाले.
या वादावरून सोशल मीडियातील लोकांमध्ये दोन मत बघायला मिळाली. काही लोकांनी पुरूषांने जे केलं योग्य असल्याचं म्हटलं तर काही लोकांनी हे योग्य नसल्याचं बोलले.