नवरदेवाने नवरीला दिला नोटांपासून बनवलेला ड्रेस, लोक म्हणाले - नशीबाने मिळतो असा नवरा....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 12:06 IST2024-05-09T12:04:47+5:302024-05-09T12:06:31+5:30

Viral Video : यात नवरदेव नोटांपासून तयार एक ड्रेस नवरीसमोर टाकतो आणि मग त्याची दोरी नवरीच्या गळ्यावर बांधतो.

Groom gave his bride the exorbitant gift of cash rolled video goes viral | नवरदेवाने नवरीला दिला नोटांपासून बनवलेला ड्रेस, लोक म्हणाले - नशीबाने मिळतो असा नवरा....

नवरदेवाने नवरीला दिला नोटांपासून बनवलेला ड्रेस, लोक म्हणाले - नशीबाने मिळतो असा नवरा....

सोशल मीडियावर रोज वेगवेगळे व्हिडीओ आणि फोटोज व्हायरल होत असतात. जे बघून कधी हसू येतं तर कधी धक्का बसतो. लग्नातील व्हिडीओ तर सध्या सगळ्यात जास्त व्हायरल होतात. असाच एक अवाक् करणारा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात नवरदेव नोटांपासून तयार एक  ड्रेस नवरीसमोर टाकतो आणि मग त्याची दोरी नवरीच्या गळ्यावर बांधतो.

इंस्टाग्रामवर Bridal & Wedding Inspo नावाच्या पेजवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओतून दिसतं की, हे लग्न भारतातील नाहीये. व्हिडीओत नवरी पांढऱ्या गाउनमध्ये दिसत आहे. नवरी उभी राहते आणि नवरदेव येऊन तिच्यासमोर नोटांपासून तयार ड्रेस टाकतो. व्हिडीओच्या कॅप्शनला लिहिलं आहे की, या नवरदेवाने नवरीसाठी $25K कॅशचं गिफ्ट दिलं.

कॅप्शननुसार, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये एक फिलिपिनो रिवाज आहे. याने त्यांना एक चांगलं फायनॅंशियल फ्यूचर बनवण्यास मदत मिळते. या व्हिडीओला 17 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर शेकडो कमेंट्स आल्या आहेत. एका यूजरने लिहिलं की, नशीबाने असा पती मिळतो. तर दुसऱ्याने लिहिलं की, जे पती महिलेंचा सन्मान करतात ते सगळ्यात चांगले असतात.

Web Title: Groom gave his bride the exorbitant gift of cash rolled video goes viral