मुंबई: एखाद्या शब्दाचा अर्थ शोधण्यासाठी आपण अनेकदा गुगलचा आधार घेतो. विशेष म्हणजे जगातील अनेक भाषांमधील शब्दांचे अर्थ गुगल ट्रान्सलेशन सांगू शकतं. त्यामुळे दैनंदिन आयुष्यात गुगल ट्रान्सलेशनचा वापर करणाऱ्यांची प्रचंड आहे. मात्र सध्या गुगल ट्रान्सलेशन एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलं आहे. मुकेश अंबानी यांचं नाव माहीत नसलेली व्यक्ती सापडणं तसं अवघडच. गेल्या अनेक वर्षांपासून भारतीयांसह जगाला अंबानी हे आडनाव माहीत आहे. धीरुभाई अंबानी यांनी अत्यंत कष्टानं रिलायन्सचं साम्राज्य उभं केलं. मात्र गुगल ट्रान्सलेटर पाहिल्यावर अंबानी या आडनावातच पैसा आहे की काय, असा प्रश्न तुम्हाला पडेल. यामागचं कारण म्हणजे अंबानी शब्द रोमानियनमधून इंग्रजीमध्ये भाषांतरित केल्यास गुगल ट्रान्सलेटर 'आय हॅव्ह मनी' (माझ्याकडे पैसा आहे) असं आऊटपूट मिळतं.
अंबानी शब्दाचं गुगलवरील भाषांतर पाहाल; तर चक्रावून जाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2019 16:02 IST