‘या’ मसाल्यापुढे सोनं-चांदीही वाटेल स्वस्त, १ किलोसाठी वापरली जातात दीड लाख फुलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 20:56 IST2022-12-01T20:56:35+5:302022-12-01T20:56:55+5:30
Most Expensive Spice: भारत अनेक गोष्टींप्रमाणे मसाल्यांसाठीही प्रसिद्ध आहे. आपण अनेक मसाल्यांची नावं ऐकली असतील ज्यांची किंमत हजारो रुपयांमध्ये असते.

‘या’ मसाल्यापुढे सोनं-चांदीही वाटेल स्वस्त, १ किलोसाठी वापरली जातात दीड लाख फुलं
Most Expensive Spice: चिभेचे चोचले चवीशिवाय पूर्ण होत नाहीत असे म्हणतात. यासाठी जेवणात वापरण्यात येणारे मसाले दर्जेदार असणे आवश्यक आहे. चांगले मसाले जेवणाला चांगली चव देतात. आजकाल मसाल्यांच्या मागणीत वाढ झाल्यामुळे त्यांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे, पण आम्ही तुम्हाला अशा मसाल्याबद्दल सांगणार आहोत ज्याची किंमत सोन्या-चांदीपेक्षाही जास्त आहे. याला 'रेड गोल्ड' असेही म्हणतात. यावरून तुम्ही त्याची किंमत अंदाज लावू शकता. या १ किलो मसाल्यासाठी जवळपास दीड लाख फुलांची आवश्यकता असते. कारण 'रेड गोल्ड'च्या एका फुलामध्ये फक्त तीन धाग्यांसारखी छोटी संरचनाच बाहेर येते.
रेड गोल्ड सामान्यतः केशर म्हणून देखील ओळखले जाते. एक किलो केशरसाठी (Saffron Most Expensive Spice) तुम्हाला सुमारे अडीच लाख ते तीन लाख रुपये मोजावे लागतील. याच्या वापराने जेवणाची चव वाढते. केशरची गणना जगातील सर्वात महाग मसाल्यांमध्ये केली जाते. जम्मू-काश्मीरच्या काही भागात याची लागवड केली जाते. केशराची वनस्पती देखील खूप महाग आहे आणि केशर प्रमाणेच त्याचे फूल देखील बाजारात चढ्या दराने उपलब्ध आहे.
केशराचे फायदे
केशरचा उपयोग अनेक आजारांवर औषध म्हणूनही केला जातो. ब्युटी क्रीम बनवण्यासाठी याचा वापर होतो. गरोदर महिलांना दुधासोबत केशर दिल्याने गर्भातील बाळाला फायदा होतो. त्याच्या वापरामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि दृष्टी सुधारते. सर्दी आणि सांधेदुखीपासून आराम मिळतो.