इंडियाज गॉट टॅलेंट! शेळीचा हा देसी जुगाड पाहुन तुम्ही म्हणाल...प्राणीही ही काही कमी नाहीत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2021 19:08 IST2021-08-08T19:07:14+5:302021-08-08T19:08:11+5:30

तुम्ही कधी प्राण्यांचा जुगाड पाहिला आहे का? चक्क एक शेळी आपलं पोट भरण्यासाठी जुगाड करत आहे. तिचा हा जुगाड पाहुन तुम्ही पोट धरुन हसाल.

goat climbs on buffalo to eat leaves from tree, video goes viral | इंडियाज गॉट टॅलेंट! शेळीचा हा देसी जुगाड पाहुन तुम्ही म्हणाल...प्राणीही ही काही कमी नाहीत...

इंडियाज गॉट टॅलेंट! शेळीचा हा देसी जुगाड पाहुन तुम्ही म्हणाल...प्राणीही ही काही कमी नाहीत...

आपले काम पटकन होण्यासाठी आपण सर्वांनी अनेक वेळा जुगाड (jugad)  किंवा शॉर्टकटचा (shortcut) अवलंब केला असेलच. मात्र तुम्ही कधी प्राण्यांचा जुगाड पाहिला आहे का? चक्क एक शेळी आपलं पोट भरण्यासाठी जुगाड करत आहे. तिचा हा जुगाड पाहुन तुम्ही पोट धरुन हसाल.

शेळीचा हा मजेदार व्हिडीओ (video) सोशल मीडियावर (social media) मोठ्या प्रमाणात व्हायरल (viral video) होत आहे. ज्यामध्ये एक भुकेलेली शेळी झाडावरून पानं तोडण्यासाठी शक्कल लढवते. उंच झाडाचे पानं खाण्यासाठी, शेळीने (goat) जबरदस्त जुगाड बनवला आहे. आपली भूक भागवण्यासाठी ही बकरी म्हशीवर चढते आणि मग झाडाची पानं तोडून ती खाण्यास सुरुवात करते. हा व्हिडीओ पाहून तुम्ही शेळीच्या हुशारीचं कौतुक करण्यापासून स्वतःला रोखू शकणार नाही.

हा व्हिडीओ आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. यासोबत त्यांने कॅप्शन लिहिलं, ‘इंडियाज गॉट टॅलेंट’. सोशल मीडियावर शेळीचा हा व्हिडीओ लोकांच्या पसंतीस उतरतो आहे. लोक केवळ हा व्हिडी शेअर करत नाहीत तर त्यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रियाही देत ​​आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण शेळीच्या बुद्धीची स्तुती करत आहेत. लोक म्हणतायत की फक्त माणसांनाच नाही तर प्राण्यांनाही जुगाड कसा करायचा हे माहित आहे.

Web Title: goat climbs on buffalo to eat leaves from tree, video goes viral