बाबो! लागोपाठ ३ आठवडे झोपून होती ही तरूणी; परीक्षाही हुकली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 16:34 IST2019-03-26T16:29:24+5:302019-03-26T16:34:28+5:30
अनेकदा तुम्ही ऐकलं असेल की, एखादी व्यक्ती १२ तास झोपली किंवा त्यापेक्षा जास्त वेळ. पण कधी तुम्ही एखादी व्यक्ती लागोपाठ ३ आठवडे झोपल्याचं ऐकलं का?

बाबो! लागोपाठ ३ आठवडे झोपून होती ही तरूणी; परीक्षाही हुकली!
अनेकदा तुम्ही ऐकलं असेल की, एखादी व्यक्ती १२ तास झोपली किंवा त्यापेक्षा जास्त वेळ. पण कधी तुम्ही एखादी व्यक्ती लागोपाठ ३ आठवडे झोपल्याचं ऐकलं का? ब्रिटनमध्ये अशी एक घटना एका तरूणीसोबत घडली आहे. ही तरूणी एकसारखी ३ आठवडे झोपलेली होती आणि यात तिची परीक्षाही निघून गेली.
Rhoda Rodriguez Diaz असं या २१ वर्षीय तरूणीचं नाव आहे. तिला एक विचित्र आजाराने पिडित आहे. या आजारामुळे ती लागोपाठ तीन आठवड्यांपर्यत झोपलेली होती. यात कालावधीत तिची परीक्षा होती. ती द्वितीय वर्षाला शिकते. मात्र ती तीन आठवडे झोपून असल्याने ती परीक्षा देऊ शकली नाही.
या सिंड्रोमला Kleine Levin Syndrome असं म्हटलं जातं. यात एकदा जर व्यक्ती झोपली तर ती २१ तासांपर्यंत झोपते. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये तिला कळालं की, ती या सिंड्रोमने पीडित आहे.
Rhoda सांगते की, या सिंड्रोममुळे लोक तिला आळशी समजतात. तसेच या सिंड्रोमच्या प्रभावाशी डील करणंही कठिण आहे. इतकेच काय तर ती बालपणापासून तिच्या मित्र-मैत्रिणीसोबतही वेळ घालवत नाही. डॉक्टर्स सांगतात की, हा एका न्यूरोलॉजी आजार आहे. आणि वाढत्या वयासोबत या आजाराचा प्रभाव कमी होत जातो.