बॉयफ्रेन्डच्या वडिलांच्या प्रेमात पडली तरूणी, दोघांनी लग्नही केलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 18:56 IST2022-06-30T18:53:57+5:302022-06-30T18:56:35+5:30

कपलचे कुटुंबिय आणि मित्र रिलेशनशिपच्या विरोधात होते, पण तरीही कपलने हे नातं पुढे नेण्याचा निर्णय घेतला. या मुलीचं नाव आहे सिडनी डीन. आता ती 27 वर्षांची झाली.

Girl fell in love with boyfriends father both got married | बॉयफ्रेन्डच्या वडिलांच्या प्रेमात पडली तरूणी, दोघांनी लग्नही केलं...

बॉयफ्रेन्डच्या वडिलांच्या प्रेमात पडली तरूणी, दोघांनी लग्नही केलं...

एक मुलगी 6व्या वर्गात होती, तेव्हाच ती तिच्यापेक्षा 24 वर्षाने मोठ्या व्यक्तीला पसंत करू लागली होती. ही व्यक्ती दुसरं कुणी नसून मुलीच्या एक्स बॉयफ्रेन्डचे वडील होते. जेव्हा मुलगी 16 वर्षांची झाली तेव्हा तिने 40 वर्षीय व्यक्तीसोबत रोमॅंटिक रिलेशन सुरू केलं. इतकंच काय पुढे जाऊन दोघांनी लग्नही केलं. 

कपलचे कुटुंबिय आणि मित्र रिलेशनशिपच्या विरोधात होते, पण तरीही कपलने हे नातं पुढे नेण्याचा निर्णय घेतला. या मुलीचं नाव आहे सिडनी डीन. आता ती 27 वर्षांची झाली. तिचा पती पॉलचं वय 51 आहे. दोघेही अमेरिकेच्या ओहियोमध्ये राहतात.

सिडनी डीन पहिल्यांदा पती पॉलला तेव्हा भेटली होती जेव्हा ती सहाव्या वर्गात होती. तेव्हा ती पॉलच्या मुलाला डेट करत होती. नंतर दोघांचं ब्रेकअप झालं. पण त्यांची मैत्री कायम होती. सिडनी नेहमीच त्याच्या घरी जात-येत होती. 

सिडनीला पॉलसोबत एक खास कनेक्शन वाटू लागलं. सिडनी जेव्हा 16 वर्षांची झाली तेव्हा दोघांमध्ये रोमान्स सुरू झाला.  अमेरिकेच्या अनेक राज्यांमध्ये 16 वर्षाची असताना सहमतीने सेक्स करण्याची परवानगी आहे. 

तेच वयात बरंच अंतर असल्याने सिडनी आणि पॉल जवळच्या लोकांमध्ये या रिलेशनशिपवरून राग होता. यानंतरही दोघांनी 2016 मध्ये लग्न केलं. आता लग्नालाही 6 वर्ष होत आलेत. पण अजूनही त्यांच्या जवळचे लोक हे नातं मानतं नाहीत.

सिडनी सांगते की, त्यांच्या दोघांचं नातं पारंपारिक नात्यांपेक्षा वेगळं आहे. मी कधीच विचार केला नव्हता की, मी पॉलवर प्रेम करू लागेन. पण मला या गोष्टीचा आनंद आहे की, मी हेच केलं. मी फक्त पॉलसोबत रोमान्स केला. पॉलला आधीच दोन मुलं आहेत. तेही या नात्याच्या विरोधात होते. पण आता त्याचंही लग्न झालं आहे. ते आता या दोघांच्या नात्या विरोधात नाहीत.

Web Title: Girl fell in love with boyfriends father both got married