सुंदर दिसण्यासाठी तरुणीनं केल्या 200 सर्जरी; खर्च वाचून व्हाल हैराण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2018 16:51 IST2018-07-18T16:49:13+5:302018-07-18T16:51:28+5:30
सुंदर दिसण्यासाठी सगळेच वेगवेगळे प्रयत्न करत असतात. त्यासाठी वेगवेगळे कॉस्मेटिक प्रोडक्ट्स, घरगुती प्रोडक्टस यांचा आधार घेतला जातो. पण सध्या सुंदर दिसण्यासाठी सर्जरी करण्याचा ट्रेंड आहे.

सुंदर दिसण्यासाठी तरुणीनं केल्या 200 सर्जरी; खर्च वाचून व्हाल हैराण
सुंदर दिसण्यासाठी सगळेच वेगवेगळे प्रयत्न करत असतात. त्यासाठी वेगवेगळे कॉस्मेटिक प्रोडक्ट्स, घरगुती प्रोडक्टस यांचा आधार घेतला जातो. पण सध्या सुंदर दिसण्यासाठी सर्जरी करण्याचा ट्रेंड आहे. अनेक अभिनेत्री, मॉडल्स सर्जरीचा आधार घेऊन आपलं सौंदर्य खुलवण्याचा प्रयत्न करतात. परंतु एका महिलेने सुंदर दिसण्यासाठी असे काही केले आहे की, जे ऐकून तुम्ही हैराण व्हाल..
बार्बी डॉलची क्रेझ प्रत्येक मुलीला असते इतकंच नाही तर तिच्यासारखं दिसावं असही प्रत्येकीला मनोमन वाटत असतं. पण 28 वर्षीय डेलगाइडिस नावाच्या एका तरुणीला लहानपणापासूनच बार्बी डॉलसारखे दिसायची इच्छा होती. यासाठी तिने एक किंवा दोन नाही, तर तब्बल 200 सर्जरी केल्या असून त्यासाठी तिने १६ लाख रूपयांपेक्षा जास्त पैसे खर्च केले आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, डेलगाइडिस लहानपणी एवढी सुंदर नव्हती. पण जेव्हा तिने सुंदरतेला समाजात मिळणारे महत्त्व पाहिले त्यावेळी तिला स्वतःच्या दिसण्याची घृणा वाटू लागली आणि आपणही बार्बी डॉलसारखं दिसायचं असं तिनं मनात पक्क केलं. त्यासाठी ती काहीही करण्याची तिची तयारी होती.
तिनं वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी घर सोडलं आणि पोल डान्सर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. यातून मिळणारे पैसे तिनं सर्जरीसाठी साठवण्यास सुरुवात केली. तिनं केलेल्या 200 सर्जरीनंतर तिचं पूर्ण रूपचं पालटून गेलं आहे.