परीक्षा द्यायला गेली अन् बंद खोलीत प्रियकरासोबत विचित्र अवस्थेत सापडली, पोलिसांनी लग्नच लावलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2021 15:50 IST2021-02-20T15:35:00+5:302021-02-20T15:50:14+5:30
Girl Caught in objectionable position with Boyfriend : रात्री दोघांना गावातील लोकांनी एका बंद खोलीत विचित्र अवस्थेत पाहिलं. गावातील लोकांनी याची माहिती पोलिसांना दिली. संतापलेले गावकरी दोघांनाही पोलिसांकडे घेऊन आले.

परीक्षा द्यायला गेली अन् बंद खोलीत प्रियकरासोबत विचित्र अवस्थेत सापडली, पोलिसांनी लग्नच लावलं
Girl Caught in objectionable position with Boyfriend : बिहारच्या(Bihar) कटिहारमध्ये एका तरूणीचं एका तरूणावर प्रेम होतं. या तरूणीला तरूणाने चुकून फोन केला होता. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री वाढली. दोघांचं हे प्रेम प्रकरण गेल्या ५ वर्षांपासून सुरू होतं. दोघांचं सतत भेटणं सुरू होतं. पण हे प्रकरण तेव्हा सर्वांसमोर जेव्हा तरूणी दहावीची परीक्षा द्यायला मनिहारीला गेली होती. इथेही तिचा प्रियकर तिला भेटायला पोहोचला. पण रात्री दोघांना गावातील लोकांनी एका बंद खोलीत विचित्र अवस्थेत पाहिलं. गावातील लोकांनी याची माहिती पोलिसांना दिली. संतापलेले गावकरी दोघांनाही पोलिसांकडे घेऊन आले.
पोलिसांनीही दिले दोघांना आशीर्वाद
पोलिसांनी दोघांच्याही कुटुंबियांना बोलवलं आणि त्यांच्या सहमतीने शेजारच्या मंदिरात दोघांचं लग्न लावून दिलं. लग्न झाल्यानंतर जोडप्याने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांचेही आशीर्वाद घेतले. त्यानंतर दोघेही तिथून निघून गेले. पण हे त्यांची समस्या इथे संपली नाही. लग्नानंतर प्रेमी युगुलाला त्यांचे कुटुंबिय घरात घेत नाहीयेत. त्यामुळे दोघेही बेघर झाले आहेत. (हे पण वाचा : बोंबला! पतीनं हॉटेलच्या बाथरूमध्ये फोटो काढून तिला व्हॉट्सअॅप केला; अन् फोटो पाहताचं असं पित्तळ पडलं उघडं)
'प्रेम मिळालं, परीक्षा कधीही देईन'
या लग्नाच्या नागात तरूणीने दहावीची परीक्षाही दिली नाही आणि आता तिचं वर्ष वाया गेलं. पण याची तिला काही पर्वा नाही. ती म्हणजे की, प्रेम यशस्वी झालंय, परीक्षा काय कधीही देता येईल. तर प्रियकर म्हणाला की, त्याचे आई-वडील घरून लग्न करण्यास तयार होते. पण तरूणीच्या घरातील लोक तयार नव्हते. त्यांनी मंदिरात लग्न लावून दिलं. आता कुठे जायचं असा प्रश्न दोघांनाही पडला आहे. (हे पण वाचा : हे काय चाललंय! गर्लफ्रेंडनं दिला मुलाला जन्म, पण बॉयफ्रेंड तिच्या आईला घेऊनच झाला पसार)
पोलीस अधिकारी एमएसएस फाकरी यांनी सांगितले की, दोघांनाही नवाबगंज भागात गावातील लोकांनी पकडलं होतं. ज्यानंतर पोलिसांनी तिथे जाऊन दोघांनाही पोलीस स्टेशनमध्ये आणलं. दोघांच्याही परिवाराच्या सहमतीने त्यांचं लग्न लावून दिलं. दोघेही वयस्क आहेत.