अरे देवा! मांजरीला मारण्यासाठी आईने दुधात टाकलं होतं विष, बाहेरून मुलगा आला अन् तेच दूध प्यायला...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 10:21 AM2021-03-11T10:21:47+5:302021-03-11T10:22:23+5:30

राजेश चौधरी नावाची तरूणाची तब्येत विष प्यायल्याने गंभीर आहे. राजेशने ते दूध प्यायलं होतं ते त्याच्या आईने मांजरीला मारण्यासाठी ठेवलं होतं.

Garwah boy drunken poison milk kept to kill cat | अरे देवा! मांजरीला मारण्यासाठी आईने दुधात टाकलं होतं विष, बाहेरून मुलगा आला अन् तेच दूध प्यायला...

अरे देवा! मांजरीला मारण्यासाठी आईने दुधात टाकलं होतं विष, बाहेरून मुलगा आला अन् तेच दूध प्यायला...

Next

झारखंडच्या गढवामधून बेजबाबदारपणाची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मेढना गावातील एका महिलेने मांजरीला जिवे मारण्यासाठी दुधात विष टाकलं होतं. मात्र, विषारी दूध मांजरीने नाही तर तिच्या मुलाने प्यायलं आणि एकच खळबळ उडाली. मुलाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. 

मीडिया रिपोर्टनुसार, राजेश चौधरी नावाची तरूणाची तब्येत विष प्यायल्याने गंभीर आहे. राजेशने ते दूध प्यायलं होतं ते त्याच्या आईने मांजरीला मारण्यासाठी ठेवलं होतं. पण हे दूध मुलाने प्यायलं. घटनेच्या संबंधात राजेश चौधरीच्या आईने सांगितले की, मांजर मोठी झाल्याने घरातील सामानाचं नुकसान करत होती. त्यामुळे मांजरीला मारण्यासाठी दुधात उंदीर मारण्याचं औषध टाकलं ते घरात ठेवलं होतं.

पीडित मुलाच्या आईने सांगितले की, तिला कल्पना नव्हती की, दूध मुलगा पिऊ शकतो. पण तो बाहेरून घरात आणि न विचारताच तो ते विष टाकलेलं दूध प्यायला. त्याची अवस्था गंभीर झाली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी सांगितले की, मुलगा आता धोक्यातून बाहेर आहे. 

या बेजबाबदार वागण्याने गावातील लोक हैराण आहेत गावातील लोक म्हणत आहेत की, या घटनेतून अनेकांनी शिकायला पाहिजे. मुलगा आता बरा आहे. पण एका चुकीमुळे परिवाराला मोठं नुकसान झालं असतं. डॉक्टर दिनेश सिंह म्हणाले की, लोकांना अशाप्रकारे बेजबाबदार वागू नये. जर मुलाला हॉस्पिटलमध्ये नेण्यास जराही उशीर झाला असता तर त्याचा जीव गेला असता. 
 

Web Title: Garwah boy drunken poison milk kept to kill cat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.