धूळ खात पडली होती ६७ कोटींची पेंटींग, घरातील लोकांना जराही नव्हती किंमतीची कल्पना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2021 03:57 PM2021-07-01T15:57:00+5:302021-07-01T15:59:57+5:30

अनेकदा काही लोकांच्या घरात इतक्या किंमती वस्तू पडून असतात ज्याची त्यांना कल्पनाही नसते. असंच काहीसं फ्रान्सच्या इपर्नेमधील एक परिवारासोबत झालं.

Fragonards painting is in epernay house from last 250 years family unknown about it | धूळ खात पडली होती ६७ कोटींची पेंटींग, घरातील लोकांना जराही नव्हती किंमतीची कल्पना

धूळ खात पडली होती ६७ कोटींची पेंटींग, घरातील लोकांना जराही नव्हती किंमतीची कल्पना

Next

अनेकदा काही लोकांच्या घरात इतक्या किंमती वस्तू पडून असतात ज्याची त्यांना कल्पनाही नसते. असंच काहीसं फ्रान्सच्या इपर्नेमधील एक परिवारासोबत झालं. त्यांना माहीत नव्हतं की, त्यांच्याकडे फ्रेन्च मास्टर फ्रॅगोनार्ड यांची हरवलेली पेंटींग आहे. या पेंटींगची किंमत ९ मिलियन डॉलर म्हणजे भारतीय करन्सीनुसार ६७ कोटी रूपये ठेवली होती. या पेंटींगचा नुकताच लिलाव करण्यात आला.

यूपीआय न्यूजनुसार एपर्नेमध्ये एनचेरेस शॅम्पेन लिलावादरम्यान एका लिलाव करणाऱ्याने सांगितलं की, त्यांना मार्ने येथील एका अपार्टमेंटममध्ये एका परिवाराने त्यांच्या संपत्तीच आकलन करण्यासाठी बोलवण्यात आलं होतं. ते तिथे गेल्यावर त्यांना भिंतीवर एक धूळ खात पडलेली पेंटींग दिसली. ही पेंटींग पाहून ते हैराण झाले.

एंटोनी पेटिट नावाच्या या व्यक्तीने पेंटींगची पाहणी केली आणि त्यांना दिसलं की, फ्रेन्च मास्टर फ्रॅगनार्ड यांचं नाव काळ्या शाईने मागच्या बाजूला लिहिलं आहे. त्यानंतर पॅरिस येथील काही तज्ज्ञांकडून पेंटींगची पाहणी करण्यात आली. त्यांनी यावर शिक्कामोर्तब केलं की, ही पेंटींग फ्रॅगोनार्ड द्वारे तयार करण्यात आलेली ए फिलॉसॉफर रीडिंग होती.

पेटिट म्हणाले की ज्या परिवाराकडे जी पेंटींग आहे त १७६८ ते १७७० दरम्यानची आहे. ते म्हणाले की, ही पेंटींग अनेक पिढ्यांनी जवळपास २०० वर्षांपासून सांभाळून ठेवली. प्रत्येक पीढीने ती सांभाळली. आता ज्यांच्याकडे ही पेंटींग आहे त्यांना कलाकाराबाबत काहीच कल्पना नव्हती. ही पेंटींग आता ९.१ मिलियन डॉलरला विकली गेली. 
 

Web Title: Fragonards painting is in epernay house from last 250 years family unknown about it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.