चार वर्षांच्या चिमुरडीनं शोधला नामशेष झालेल्या डायनासोरच्या पायाचा ठसा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2021 06:53 PM2021-02-01T18:53:41+5:302021-02-01T18:54:04+5:30

वेल्सच्या किनाऱ्यावर वडिलांसोबत फिरत असताना हजारो वर्षांपूर्वी नामशेष झालेल्या डायनासोरच्या पायाचा ठसा आढळला

Four year old girl discovers 220 million year old dinosaur footprint at a beach in Wales | चार वर्षांच्या चिमुरडीनं शोधला नामशेष झालेल्या डायनासोरच्या पायाचा ठसा

चार वर्षांच्या चिमुरडीनं शोधला नामशेष झालेल्या डायनासोरच्या पायाचा ठसा

Next

ब्रिटनमधील एका ४ वर्षीय मुलीनं डायनासोरच्या पायाचा ठसा शोधून काढला आहे. वेल्समधील एका समुद्र किनाऱ्यावर मुलीला डायनासोरच्या पायाचा ठसा आढळून आला. गेल्या दशकभरात ब्रिटनमध्ये डायनासोरच्या पायाचा इतका स्पष्ट ठसा आढळून आलेला नव्हता. डायनासोरच्या पावलाचा ठसा शोधणाऱ्या मुलीचं नाव लिली वायल्डर असं आहे. लिलीनं शोधलेल्या ठशावर आता संशोधक पुढील संधोशन करतील. लिलीनं शोधून काढलेला ठसा २२० मिलियन वर्षे जुना आहे.

आता मृत लोकांसोबतही करता येणार चॅटींग, विचित्र वाटत असलं तरी हे खरंच होणार आहे...

दक्षिण वेल्समधील बॅरी परिसरात असलेल्या समुद्र किनाऱ्याजवळ चालत असताना लिली वायल्डरला १० सेटिंमीटरचा पावलाचा ठसा दिसला. या डायनासोरची उंची ७५ सेंटिमीटर आणि लांबी अडीच मीटर असावी, असा अंदाज आहे. हा डायनासोर दोन पायांवर चालणारा होता आणि तो लहान मोठे किटक खायचा असं वृत्त द इंडिपेंडंटनं दिलं आहे. वेल्स संग्रहालयानं लिलीनं शोधलेल्या पावलाच्या ठशाचं छायाचित्र प्रसिद्ध केलं आहे.



वेल्स संग्रहालयाच्या पॅलिअँटॉलॉजी क्युरेटर सिंडी हॉवेल्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, वेल्सच्या किनाऱ्यावर सापडलेला हा डायनासोरच्या पावलाचा सर्वोत्तम ठसा आहे. लिली आणि तिचे वडील रिचर्ड यांनी डायनासोरच्या पावलाचा ठसा शोधून काढला. वडिलांसोबत समुद्र किनारी फिरत असताना लिलीला डायनासोरच्या पावलाचा ठसा दिसला. त्यांना पावलाचा ठसा आश्चर्यजनक वाटला. आता हा ठसा राष्ट्रीय संग्रहालयात ठेवण्यात येणार आहे.

Web Title: Four year old girl discovers 220 million year old dinosaur footprint at a beach in Wales

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.