अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांच्या अंडरविअरचा लिलाव, किंमत वाचून व्हाल अवाक्!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 16:43 IST2025-03-04T16:42:57+5:302025-03-04T16:43:55+5:30
JFK Underwear Sale : तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण एका लिलावात अमेरिकेचे माजी दिवंगत राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी (JFK) यांनी वापरलेली एक अंडरविअर होती.

अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांच्या अंडरविअरचा लिलाव, किंमत वाचून व्हाल अवाक्!
JFK Underwear Sale : लिलाव म्हटला की, त्यात वेगवेगळ्या दुर्मीळ गोष्टींचा लिलाव केला जातो. या अनेक जुन्या वस्तू, हीरे, दागिने, नाणी, गाड्या अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो. पण तुम्ही कधी लिलाव एखादी अंडरविअर विकायला होती असं ऐकलं नसेल. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण एका लिलावात अमेरिकेचे माजी दिवंगत राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी (JFK) यांनी वापरलेली एक अंडरविअर होती. १९४० मध्ये या ऐतिहासिक अंडरविअरवर JFK चं निकनेम ‘Jack’ लिहिण्यात आलं होतं. या अंडरविअरसाठीची बोली $9,100 म्हणजे साधारण ७.५ लाखांपर्यंत पोहोचली होती.
अंडरविअरसाठी लाखोंची बोली
लॉस एंजलिसमध्ये आयोजित या लिलावात जॉन एफ. केनेडी (JFK) यांची अंडरविअर सगळ्यात जास्त चर्चेत होती. १९४० दरम्यान नेव्हीमध्ये सेवा देत असताना JFK यांनी जी अंडरविअर वापरली होती, ती आता कुणाच्यातरी कलेक्शनचा भाग बनली आहे. या अंडरविअरवर त्यांचं निकनेम ‘Jack’ कोरण्यात आलं होतं. त्यामुळे या अंडरविअरसाठी ७.५ लाख रूपयांची बोली लागली.
झुकरबर्गची हुडी सुद्धा महाग
फेसबुकचे को-फाउंडर मार्क झुकरबर्गची हुडी सुद्धा या लिलावात ठेवण्यात आली होती. ही हुडी त्यानं २०१० मध्ये वापरली होती. आधी असा अंदाज होता की, या हुडीला ८३ हजार रूपयांपर्यंत किंमत मिळेल. पण नंतर बोली वाढत वाढत १३ लाख रूपयांपर्यंत पोहोचली.
हुडीसोबत आणखी एक खास बाब म्हणजे, ज्यानं ही हुडी खरेदी केली त्याला मार्कच्या हातून लिहिलेली एक नोटही मिळाली. ज्यात त्यानं लिहिलं आहे की, "ही माझी सगळ्यात आवडीच्या हुडीपैकी एक होती. सुरूवातीच्या दिवसात मी ही हुडी खूप वापरली. आत आमच्या ओरिजनल मिशन स्टेटमेंटची लायनिंगही आहे. ही एन्जॉय कर!".
स्टीव जॉब्स यांची टाय सगळ्यात महाग ठरली
चर्चा भलेही केनेडी यांच्या अंडरविअरची झाली असेल, पण या लिलावात सगळ्यात महाग विकली गेली ती अॅप्पलचे को-फाउंडर स्टीव जॉब्स यांची टाय. स्टीव यांची हिरवी आणि गुलाबी लाइन असलेली बॉ टाय त्यांनी १९८४ मध्ये मॅकिन्टोशन कॉम्प्युटर लॉन्च वेळी घातली होती. याची अंदाजे किंमत ८३ हजार मिळेल असं वाटलं होतं. मात्र, या टायसाठी एका व्यक्तीनं ३० लाख रूपये बोली लावली.