बोंबला! कोरोना पॉझिटिव्ह आल्यावर फ्लाइट पकडून पळून जात होती माजी मिस इंग्लंड आणि....

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2021 09:33 AM2021-01-05T09:33:46+5:302021-01-05T09:34:28+5:30

डेली नेशनच्या रिपोर्टनुसार, हे कपल गेला चार वर्षांपासून एकमेकांना डेट करतं आणि गेल्या आठवड्यात दोघेही व्हर्जिन अटलांटिक फ्लाइटने बारबाडोसला आले होते.

Former miss England tried to run away from barbados after she found out to be corona positive | बोंबला! कोरोना पॉझिटिव्ह आल्यावर फ्लाइट पकडून पळून जात होती माजी मिस इंग्लंड आणि....

बोंबला! कोरोना पॉझिटिव्ह आल्यावर फ्लाइट पकडून पळून जात होती माजी मिस इंग्लंड आणि....

Next

माजी मिस इंग्लंड जारा हॉलॅंडवर कोरोना व्हायरसचे नियम तोडण्याचा आरोप आहे. जारा कोरोना पॉझिटिव्ह असूनही तिच्या बॉयफ्रेन्डसोबत बाराबाडोसमधून पळून जाण्याचा प्रयत्न करत होती. २५ वर्षीय जारा आणि तिचा ३० वर्षीय बॉयफ्रेन्ड एलियट लव्ह याला ग्रॅंटली एडम्स इंटरनॅशनल एअरपोर्टवर अटक करण्यात आली. जारावर १८ हजार पाउंडचा दंड ठोठावण्यात आला आहे. सोबतच तिला एक वर्षांची शिक्षाही होऊ शकते. 

डेली नेशनच्या रिपोर्टनुसार, हे कपल गेला चार वर्षांपासून एकमेकांना डेट करतं आणि गेल्या आठवड्यात दोघेही व्हर्जिन अटलांटिक फ्लाइटने बारबाडोसला आले होते. त्याना क्राइस्ट चर्च हॉटेलमध्ये क्वारंटाइन करण्यात आले होते. सामान्यपणे बारबाडोसला येण्याआधी लोकांना आधीच ऑनलाइन फॉर्म भरावा लागतो आणि आपल्या निगेटिव्ह टेस्टचा रिपोर्टही दाखवावा लागतो. त्यानंतर बेटावरही टेस्ट करावी लागते. टेस्ट पॉझिटिव्ह आली तर त्यांना २४ तास सरकारी सुविधेत ठेवलं जातं.

त्यानंतर पुन्हा एकदा त्यांची टेसस्ट होते आणि टेस्ट पुन्हा पॉझिटिव्ह आली तर त्यांना जाऊ दिलं जात नाही. निगेटिव्ह होईपर्यंत त्यांना क्वारंटाइन ठेवलं जातं. त्यानंतर ते त्यांचं व्हेकेशन सुरू करू शकतात. कोरोनामुळे कठोर नियम असताना देखील देशात कोरोनाचे आतापर्यंत ३८३ केसेस समोर आले आहेत. 

मिनिस्ट्री ऑफ हेल्थच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या कपलपैकी एक कोरोना पॉझिटिवह आहे. त्यांनी त्यांचे रिस्टबॅंन्ड काढले, टॅक्सी केली आणि एअरपोर्टसाठी निघाले. एअरपोर्टला जाऊन त्यांनी यूकेसाठी फ्लाइट बुक करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना पोलिसांनी लगेच अटक केली.

बाराबडोस टुडे न्यूज वेबसाइटनुसार, जाराने तिच्या या कारनाम्यासाठी लोकांची माफी मागितली आहे. ती म्हणाली की, बाराबडोसच्या लोकांची मला माफी मागायची आहे. एका फार मोठ्या गैरसमजामुळे ही घटना झाली. मी सध्या स्थानिक प्रशासनासोबत मिळून हा मुद्दा सोडवत आहे. मी या शानदार बेटावर पाहुणी आहे आणि मी असं काही करणार नाही ज्याने या सुंदर ठिकाणाचं नुकसान होईल.
 

Web Title: Former miss England tried to run away from barbados after she found out to be corona positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.