महिन्याला २ लाखांपेक्षा जास्त पगार, तरीही कुणी करायला तयार नाही 'या' ५ नोकऱ्या; पाहा नेमकं काय करावं लागतं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 13:43 IST2026-02-03T13:40:15+5:302026-02-03T13:43:56+5:30

Weird Professions: भारतासोबतच अमेरिका आणि यूरोपमध्ये या प्रोफेशनची डिमांड वाढत आहे, पण तरीही लोक ही कामं करायला धजावत नाहीत. अशाच काही वेगळ्या प्रोफेशनबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.

Five unusual jobs that pay in lakhs but people dont want to do it | महिन्याला २ लाखांपेक्षा जास्त पगार, तरीही कुणी करायला तयार नाही 'या' ५ नोकऱ्या; पाहा नेमकं काय करावं लागतं

महिन्याला २ लाखांपेक्षा जास्त पगार, तरीही कुणी करायला तयार नाही 'या' ५ नोकऱ्या; पाहा नेमकं काय करावं लागतं

Weird Professions: जास्तीत जास्त तरूण सरकारी किंवा आयटी सेक्टरमधील नोकरीच्या मागे धावतात. पण असेही काही अजब प्रोफेशन्स आहेत, ज्यात काम तर अजब असतं, पण महिन्याला लाखो रूपये पगारही मिळतो. हे असे काही प्रोफेशन आहेत, ज्याबाबत लोक चर्चाही करत नाहीत. कारण या नोकरींमध्ये डिग्रीपेक्षा हिंमत, मानसिक तयारी आणि अशा स्थितीत काम करण्याची इच्छा हवी, जिथे सामान्य माणूस जाण्याचा विचारही करत नाही. भारतासोबतच अमेरिका आणि यूरोपमध्ये या प्रोफेशनची डिमांड वाढत आहे, पण तरीही लोक ही कामं करायला धजावत नाहीत. अशाच काही वेगळ्या प्रोफेशनबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.

एम्बाल्मर काय करतो?

एम्बाल्मरला मृत्यूनंतरचा मेकअप आर्टिस्ट म्हटलं जातं. हे एक असं प्रोफेशन आहे, ज्यात अंत्यसंस्काराआधी मृतदेहाला केमिकल्सने सुरक्षित केलं जातं. जेणेकरून शरीर सडण्याची प्रक्रिया हळू व्हावी. अमेरिका आणि यूरोपमध्ये ही सामान्य बाब आहे. आता भारतातही याची डिमांड वाढत आहे. या क्षेत्रात प्रशिक्षित लोकांची कमतरत आहे. ज्यामुळे एक चांगला एम्बाल्मर महिन्याला २ ते ३ लाख रूपयांपर्यंत कमाई करू शकतो. हे काम तसं भावानात्मक दृष्टीने अवघड आहे, पण पैसे याच कारणाने जास्त मिळतात.

पेट फूड टेस्टर

आपण म्हणून शकता की, ही काय विचित्र नोकरी आहे. पण अशी नोकरी आहे. मोठ्या पेट फूड कंपन्या मनुष्यांना कामावर ठेवतात, जेणेकरून ते प्राण्यांच्या खाण्याची टेस्ट, बनावट आणि गुणवत्ता तपासतील. त्यांचं काम जेवण सुरक्षित आणि पोषण असलेलं आहे की नाही हे चेक करणं असतं. फूड सायन्सशी संबंधित लोक या नोकरीत चांगलं पॅकेज मिळवू शकतात. पण लोकांना जेव्हा कळतं की, त्यांना कुत्रा किंवा मांजरीचं जेवण टेस्ट करावं लागेल, तर ते मागे हटतात.

कमर्शियल डायवर

खाडी देश म्हणजे पर्शियन आखाताच्या किनारपट्टीवर वसलेले पश्चिम आशियातील देश. यात मुख्यत्वे सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती (UAE), कुवेत, कतार, बहारिन आणि ओमान या सहा देशांचा समावेश होतो. या देशांमध्ये कमर्शिअल डायवरची खूप डिमांड असते. या लोकांना भरपूर पैसे मिळतात. या लोकांना खोल समुद्रात जाऊन तेलाच्या पाइपलाईन दुरूस्त करायच्या असतात. त्यांना विषारी पाण्यात काम करावं लागतं. जीवाला धोका नेहमीच असतो, त्यामुळे कंपन्यांना या लोकांना भरपूर पैसे देतात. एका महिन्याच्या प्रोजेक्टमधून ५ ते १ लाख रूपये मिळू शकतात. पण धोका जास्त असल्याने लोक या फिल्डपासून दूरच राहतात.

वेस्ट मॅनेजमेंटमध्ये पैसाच पैसा

ड्रेनेज आणि वेस्ट मॅनेजमेंट एक्सपर्ट्सचं काम भलेही घाणेरडं वाटत असेल, पण हे पूर्णपणे टेक्नॉलॉजीवर आधारित आहे. यात रोबोटिक मशीन आणि अॅडव्हान्स सिस्टीमने विषारी कचरा आणि गॅस सांभाळला जातो. विकसित देशांमध्ये या स्किलची मोठी डिमांड आहे. यात पैसेही भरपूर मिळतात. पण समाज काय विचार करेल म्हणून लोक या फिल्डला सन्मानजनक करिअर मानत नाहीत.

लाइन स्ट्रँडर

न्यूयॉर्क आणि लंडनसारख्या मोठ्या शहरांमध्ये प्रोफेशनल लाइन स्टँडरला चांगलीच डिमांड आहे. आयफोन लॉन्च किंवा ब्लॅक फ्रायडे सेलसारख्या दिवसात लोक दुसऱ्या कुणाला तरी लाइनमध्ये उभे करतात. याबदल्यात त्यांना एक तासांसाठी ३ ते ५ हजार रूपये मिळतात. हा ट्रेंड आता भारतातही हळूहळू प्रीमिअम इव्हेंट्स आणि व्हीआयपी दर्शनासाठी बघायला मिळतोय. यात वेळ आणि धैर्य विकून चांगली कमाई केली जाऊ शकते.

Web Title : महीने के लाखों, फिर भी कोई नहीं चाहता ये नौकरियां: जानें क्यों।

Web Summary : एम्बल्मिंग, पेट फूड टेस्टिंग, कमर्शियल डाइविंग और वेस्ट मैनेजमेंट जैसे अपरंपरागत नौकरियां अच्छी सैलरी देती हैं, लेकिन चुनौतीपूर्ण परिस्थितियों और सामाजिक धारणाओं के कारण लोग हिचकिचाते हैं। लाइन में खड़े रहने से भी जल्दी कमाई होती है।

Web Title : High-paying jobs nobody wants: Explore these unconventional career paths.

Web Summary : Unconventional jobs like embalming, pet food testing, commercial diving, and waste management offer high salaries but face reluctance due to challenging conditions and social perceptions. Line standing also provides quick income.