एक नंबर! ड्रोनच्या माध्यमातून किडनीची डिलिव्हरी, रूग्णाचं ऑपरेशन यशस्वी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2019 15:30 IST2019-05-03T15:21:56+5:302019-05-03T15:30:28+5:30
ड्रोनच्या माध्यमातून शूट करण्यात आलेली सुंदर ठिकाणांची सुंदर चित्र तुम्ही अनेकदा पाहिली असेल. तसेच ड्रोनच्या माध्यमातून गुप्तहेरी केल्याचंही तुम्ही ऐकलं असेल.

एक नंबर! ड्रोनच्या माध्यमातून किडनीची डिलिव्हरी, रूग्णाचं ऑपरेशन यशस्वी!
ड्रोनच्या माध्यमातून शूट करण्यात आलेली सुंदर ठिकाणांची सुंदर चित्र तुम्ही अनेकदा पाहिली असेल. तसेच ड्रोनच्या माध्यमातून गुप्तहेरी केल्याचंही तुम्ही ऐकलं असेल. मात्र, याच ड्रोनचा वेगळ्या प्रकारे वापर करून एका व्यक्तीचा जीव वाचण्यात आला आहे. अमेरिकेतील मेरीलॅंडच्या एका रूग्णालयात ड्रोनच्या माध्यमातून किडनीची डिलिव्हरी केली गेली. मेडिकलच्या विश्वात असं पहिल्यांदाच झालं आहे की, एखादा मानवी अंग ड्रोनच्या माध्यमातून एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवला.
द न्यूयॉर्क टाइम्सनुसार, युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलॅंडच्या डॉक्टरांनी सांगितले की, ड्रोनच्या माध्यमातून केला गेलेला हा प्रयोग यशस्वी ठरला. ड्रोनने पाच किलोमीटरचं अंतर १० मिनिटात पार केलं आणि किडनी पोहोचवली. ज्यानंतर रूग्णांचं यशस्वी ट्रान्सप्लांट करण्यात आलं.
या ड्रोनमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा आहेत. म्हणजे हा ड्रोन ४०० फूटाच्या उंचीपर्यंत उडू शकतो. यात दोन बॅटरी आहेत. डॉक्टर्स या ड्रोनला Uber Of Organs असं म्हणताहेत.
ज्या महिलेची किडनी ट्रान्सप्लांट करण्यात आली त्या महिलेचं वय ४४ वर्ष आहे. Trina Glispy असं तिचं नाव असून ती नर्स आहे. २०११ मध्ये तिला कळालं की, तिला किडनी संबंधी आजार आहे. गेल्या ८ वर्षांपासून ती डायलिसिसवर होती. आधी त्यांना कुणी डोनर मिळत नव्हतं. नंतर एक डोनर मिळाला आणि तिचं ऑपरेशन शक्य झालं. मात्र ड्रोनने किडनी डिलिव्हरी करण्याआधी अनेक टेस्ट घेण्यात आल्या होत्या.
डॉक्टर जोसेफ आर, युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलॅंडचे असिस्टंट प्रोफेसर आहेत. त्यांनी ही टीम लीड कोली होती. त्यांनी सांगितले की, एकदा किडनी रूग्णापर्यंत पोहोचण्यासाठी २९ तास लागले होते. त्यानंतर ही संकल्पना डोक्यात आली. या ड्रोनमुळे मेडिकल विश्वाला अनेक दृष्टीने फायदा होणार आहे.