बोंबला! एअर होस्टेसच्या बॉयफ्रेन्डने केली पायलटची धुलाई, पुढे काय झालं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 11:21 IST2019-10-22T11:19:59+5:302019-10-22T11:21:19+5:30

विमानातील वेगवेगळ्या विचित्र गोष्टी नेहमीच समोर येत असतात. अशीच एक विचित्र घटना पुन्हा एकदा समोर आली आहे.

Fight between air hostess boyfriend and pilot | बोंबला! एअर होस्टेसच्या बॉयफ्रेन्डने केली पायलटची धुलाई, पुढे काय झालं?

बोंबला! एअर होस्टेसच्या बॉयफ्रेन्डने केली पायलटची धुलाई, पुढे काय झालं?

विमानातील वेगवेगळ्या विचित्र गोष्टी नेहमीच समोर येत असतात. अशीच एक विचित्र घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. ही घटना आहे ब्रिटीश एअरवेजमधील. Natalie Flindall ही एअर होस्टेस म्हणून यात काम करते. ती टूरवर जात होती. सिडनी ते लंडन असा प्रवास ती करणार होती. यात ती बॉयफ्रेन्डला सुद्धा सोबत घेऊन गेली. इथपर्यंत सगळं ठीक होतं. पण समस्या तेव्हा झाली जेव्हा तिच्या बॉयफ्रेन्डने दारूच्या नशेत पायलटला मारहाण केली.

या विमानाचा स्टे सिंगापूरमध्ये होता. येथीलच एका हॉटेलमध्ये Natalie Flindall तिच्या इतर स्टाफसोबत थांबली होती. इथे तिच्या बॉयफ्रेन्डला सुद्धा तिथे बोलवलं.

इथे येऊन तिच्या बॉयफ्रेन्डने दारू ढोसली. इतकेच काय तर काही लोकांनी असेही सांगितले की, त्याने विमानातही दारू प्यायली होती. त्यानंतर तो हॉटेलच्या रिसेप्शनवर पायलटसोबत भिडला. पण दोघात भांडणं कशामुळे झालं याचं कारण समोर आलं नाही.

Natalie च्या बॉयफ्रेन्डच्या कारनाम्याचा फटका तिला बसला. तिला तिच्या चुकीमुळे सस्पेंड करण्यात आलं आहे. तसेच पायलटची सुद्धा चौकशी केली जाणार आहे.


Web Title: Fight between air hostess boyfriend and pilot