कारमध्ये अल्पवयीन मुलीसोबत संबंध ठेवत होती महिला, अचानक पोहोचला पती; आणि मग....
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2021 13:02 IST2021-11-18T12:57:16+5:302021-11-18T13:02:33+5:30
एमी जोन्स आणि तिची पती फिलिप यांच्यातील नातं फार चांगलं नव्हतं. दोघेही मुलांसाठी सोबत राहत होते. अशात एमी एका अल्पवयीन मुलीसोबत वेळ घालवू लागली होती.

कारमध्ये अल्पवयीन मुलीसोबत संबंध ठेवत होती महिला, अचानक पोहोचला पती; आणि मग....
ब्रिटनमध्ये एक महिला शिक्षिकेला तिच्या पतीनेच तुरूंगात धाडलं. महिला एका अल्पवयीन मुलीसोबत नात्यात होती आणि दोघींनी कारमध्ये शारीरिक संबंध ठेवताना पतीने रंगेहाथ पकडलं होतं. महिलेने आपलं अफेअर लपवण्यासाठी पूर्ण प्लॅनिंग केलं, आपल्या अल्पवयीन प्रेयसीला तिने टिचिंग असिस्ंटट असल्याचं सांगितलं. जेणेकरून पतीला संशय येऊ नये. पण सत्य जास्त काळ लपून राहू शकलं नाही.
‘द सन’ च्या रिपोर्टनुसार, इंग्लिश काउंटी डरहमच्या डार्लिंगटनमद्ये राहणारी ३५ वर्षीय एमी जोन्सला सोशल वर्कर असलेला पती फिलिजने अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवताना रंगेहाथ पकडलं होतं. यानंतर त्याने पत्नीविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. कारण प्रकरण अल्पवयीन मुलीचं होतं. त्यामुळेच कोर्टाने महिलेला आठ महिन्यांची शिक्षा सुनावली.
एमी जोन्स आणि तिची पती फिलिप यांच्यातील नातं फार चांगलं नव्हतं. दोघेही मुलांसाठी सोबत राहत होते. अशात एमी एका अल्पवयीन मुलीसोबत वेळ घालवू लागली होती. ती शाळेतील सहकारी असल्याचं तिने सांगितलं होतं. एमी आपल्या पतीला म्हणाली की, अल्पवयीन मुलगी तिच्या शाळेत टीचिंग असिस्ंटट आहे. इतकंच नाही तर शाळेलाही यासाठी तयार केलं होतं की, कुणी विचारलं तर सांगा की, ती तिची असिस्टंट आहे.
फिलिपला पत्नी आणि त्या अल्पवयीन मुलीला सोबत बघून संशय आला होता. पण त्याने तसं जाणवू दिलं नाही. तो दोघींवरही नजर ठेवून होता आणि एक दिवस त्याने त्यांना कारमध्ये सेक्स करताना रंगेहाथ पकडलं. नंतर एमी जोन्सने स्वीकार केलं की, तिचं अल्पवयीन मुलीसोबत अफेअर सुरू आहे.
एमीने सांगितलं की, दोघी बऱ्याच दिवसांपासून नात्यात आहे आणि त्यांच्यात सगळं काही दोघींच्या सहमतीने होत आहे. महिलेने अल्पवयीन मुलीला सांगितलं होतं की, ती Bisexual आहे आणि तिचं तिच्यावर प्रेम आहे. सुरूवातीला मुलीला समजलं नाही की, काय रिअॅक्ट करावं. पण नंतर ती सुद्धा या नात्यासाठी तयार झाली.