हॉट फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असल्याने कंपनीने तिला नोकरीहून काढलं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2020 15:23 IST2020-02-03T15:18:03+5:302020-02-03T15:23:05+5:30
ही तरूणी जिममधील एक्सरसाइज करतानाचे फोटो आणि बिकिनीतील फोटो सोशल मीडियात शेअर करत होती.

हॉट फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असल्याने कंपनीने तिला नोकरीहून काढलं!
अमेरिकेतील मोंटानामध्ये Presley Pritchard नावाची एक तरूणी फायर फायटर म्हणून काम करत होते. पण तिला नुकतंच एक विचित्र कारण देऊन नोकरीहून काढून टाकण्यात आलं आहे. 'द मिरर' ने दिलेल्या वृत्तानुसार, प्रेसले आता यावर उघडपणे बोलू लागली आणि तिने तिच्या कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत.
प्रेसले म्हणाली की, 'तिला अधिकाऱ्यांनी तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर स्वत:चे बोल्ड फोटो पोस्ट करण्याचं कारण देत नोकरीहून काढलं आहे. असे फोटो पुरूषांनी पोस्ट केले तर कुणी काही म्हणत नाही, पण मला नोकरीहून काढलं. कारण मी एक मुलगी आहे'.
27 वर्षीय प्रेसलेने सांगितले की, ती एवरग्रीन फायर रेस्क्यूमध्ये काम करत होती. तिच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं की, मी जिममध्ये एक्सरसाइज करतानाने किंवा बिकिनीवरील फोटो कंपनीच्या बदनामीचं कारण ठरत आहे. मला हे सांगण्यात आलं की, मी वर्क प्लेस पॉलिसीच्या विरूद्ध काम केलं आहे.
प्रेसले म्हणाली की, 'मला असं वाटतं की, तुम्हाला एखाद्याचे कपडे आवडतात किंवा आवडत नाही हा तुमचा अधिकार आहे. पण ते त्यांच्या पसंतीने कपडे घालतात आणि फोटो शेअर करतात. मी जिममध्ये कशी दिसते, कसे कपडे घालते या आधारावर मला संस्थेने टारगेट केलं'.