ऐन लग्नात सासऱ्याने केली घटस्फोटाची घोषणा, सुन म्हणाली, 'आधी माफी मागा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 18:32 IST2022-02-09T15:43:33+5:302022-02-09T18:32:48+5:30

नवरीमुलगीनेच लग्नाच्या दिवशी सासाऱ्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तिने थेट सासऱ्याला माफी मागण्याचा हट्ट धरला आहे.

father declare divorce on sons wedding daughter in law asks for apology | ऐन लग्नात सासऱ्याने केली घटस्फोटाची घोषणा, सुन म्हणाली, 'आधी माफी मागा'

ऐन लग्नात सासऱ्याने केली घटस्फोटाची घोषणा, सुन म्हणाली, 'आधी माफी मागा'

लग्नाचा (wedding) आनंद वेगळाच असतो. तो खास दिवस खास बनवण्यासाठी प्रत्येक व्यक्ती खूप प्रयत्न करत असतो. पण अनेकदा काही ना काही गडबड ही होतेच. देण्या घेण्यावरुन अनेकदा पाहुण्यामध्ये रुसवे फुगवे सुरु होत असतात. मात्र, इथे नवरीमुलगीनेच लग्नाच्या दिवशी सासाऱ्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तिने थेट सासऱ्याला माफी मागण्याचा हट्ट धरला आहे.

आपल्या मुलाच्या लग्नात बापाने एका अशा गोष्टीची घोषणा केली ज्यामुळे नवरी मुलगी नाराज आहे. लग्नाचा दिवस खराब केल्याप्रकरणी त्यांनी तिची माफी मागावी अशी तिची इच्छा आहे, पण नवऱ्यामुलाला ते अजिबात पटलेलं नाही. उलट आपल्या वडिलांना पाठिंबा द्यावा असे त्याचे मत आहे.

मुलाच्या वडिलांनी आपल्या मुलाच्या लग्नाच्या दिवशी घटस्फोटाची घोषणा केली, ज्यामुळे वधू त्याच्यावर चिडली आहे. मुलाच्या लग्नाच्या दिवशीच बायकोला घटस्फोट द्यायचा हे मुलाच्या वडिलांनी पहिल्यापासूनच ठरवुन ठेवले होते. कारण त्याच्या पत्नीने त्याला आयुष्यात कधीच प्राधान्य दिले नाही. म्हणून त्याने मुलाच्या लग्नापर्यंत वाट पाहिली आणि त्याच दिवशी आपल्या मुलाच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण सर्वात वाईट अनुभवात बदलला.

पत्नी नेहमी त्यांच्यापेक्षा नोकरीला जास्त महत्त्व देते. मुलाच्या लग्नाच्या दिवशी, त्याने बायकोला शेवटचे विचारले की ती तिची नोकरी आणि तिचा नवरा यापैकी कोणाची निवड करेल. त्यावेळी तिने नोकरी निवडली. त्यानंतर वडिलांनी सर्वांसमोर घटस्फोटाची घोषणा केली.

सासऱ्याच्या या कृत्याने नवरी मुलगी नाराज झाली आहे. याबाबत त्यांनी रेडिटवर आपले मत मांडले तेव्हा सर्वांनी नववधूला पाठिंबा दिला. प्रत्येकाचा असा विश्वास आहे की त्यांना त्यांच्या मुलाच्या लग्नाचा दिवस त्यांच्या स्वतःच्या कारणांसाठी खराब करण्याचा अधिकार नाही. मुलगा आणि सुनेच्या आनंदाच्या दिवशी त्यांनी चुकीचा निर्णय जाहिर केला आहे. दरम्यान, घटस्फोटानंतर दोघेही पुन्हा एकमेकांना डेट करू लागले. त्यामुळे नवरी मुलगीचा राग अनावर झाला आहे.

Web Title: father declare divorce on sons wedding daughter in law asks for apology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.