नादच खुळा! इंटरनेटवर पाहून शेतकऱ्यानं केली कमाल; चंदनाची शेती केली अन् झाले मालामाल

By manali.bagul | Published: December 6, 2020 06:07 PM2020-12-06T18:07:38+5:302020-12-06T18:27:27+5:30

Trending Viral News in Marathi : सुरुवातीला बँगलोर येथे लागवडीसाठी दहा दिवसांचे प्रशिक्षण घेऊन शेती करण्यास सुरूवात केली. यानंतर गुजरातच्या (गुजरात) मेहसाना येथील एका शेतकऱ्याशी संपर्क साधला आणि चंदन झाडे लावण्याबाबत संपूर्ण माहिती विचारली.

Farmer did sandalwood farming in rajasthan took training from internet | नादच खुळा! इंटरनेटवर पाहून शेतकऱ्यानं केली कमाल; चंदनाची शेती केली अन् झाले मालामाल

नादच खुळा! इंटरनेटवर पाहून शेतकऱ्यानं केली कमाल; चंदनाची शेती केली अन् झाले मालामाल

Next

 राजस्थानच्या श्रीगंगानगरमधील सादुलमधील एका बळीराजाला आल्या मेहनतीचे फळ मिळाले आहे. कष्ट आणि अधनिक तंज्ञाच्या जोडीने या बळीराजाने  चंदनाच्या सुवासामधून यश मिळवलं आहे. ही चंदनाची शेती पाहण्यासाठी लांबून लांबून लोक येत आहेत. जसवंत ढिल्लों नावाच्या या शेतकऱ्याच्या मेहनतीमुळे श्री गंगानगर जिल्ह्यात आज चंदनाचा सुगंध दरवळत आहे. जसवंत यांनी आपल्या जमिनीच्या काही भागात नवीन पीक लावण्याचा विचार केला. त्यानंतर इंटरनेटवर याबाबत माहिती मिळवली.

सुरुवातीला, बँगलोर येथे लागवडीसाठी दहा दिवसांचे प्रशिक्षण घेऊन शेती करण्यास सुरवात केली. यानंतर गुजरातच्या (गुजरात) मेहसाना येथील एका शेतकऱ्याशी संपर्क साधला आणि चंदन झाडे लावण्याबाबत संपूर्ण माहिती विचारली. त्या शेतकर्‍याने दोन हजार चंदन झाडे लावली पण दोन हजारांपैकी केवळ दीडशे रोपे जगली. शेतकरी जसवंत ढिल्लों यांनी सांगितले की, ''आता पाच ते सात फूटांपर्यंत झाडे वाढली आहेत. हिवाळ्यात त्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक असते. सुरुवातीला दोन ते तीन महिन्यांपर्यंत कीटकनाशक पेस्टिसाइडचा वापर केला गेला, परंतु नंतर काहीही वापरण्यात आले नाही.''

चंदन वृक्ष लागवडीनंतर ५ वर्षानंतर सुगंध देऊ लागतो. १० ते १५ वर्षांनंतर, वनस्पती पूर्णपणे तयार होते. झाडावरील हार्डवुडची किंमत त्याच्या किंमतीवर अवलंबून असते. हार्डवुडची किंमत सतत वाढत आहे. चंदनाचे एक झाड दोन ते तीन लाखांना विकले जाते.  जसवंत ढिल्लन यांनी इतर शेतकर्‍यांना सूचना देताना सांगितले की, दहा वर्षे वृक्ष तयार होईपर्यंत ते दरम्यान पिके घेतील आणि जादा उत्पन्न घेतील. दक्षिणेकडील चार राज्यात चंदन लागवडीसाठी शासनाची परवानगी घ्यावी लागेल. राजस्थानात मात्र असे नाही. त्यामुळे राजस्थानमधील शेतकरी त्याची लागवड सहज करू शकतात. बापरे! कधीही पाहिली नसेल दोन वाघांमधील 'अशी' लढाई; पाहा थरारक व्हिडीओ

खासियत

चंदनाच्या झाडाची विशेषता म्हणजे सुगंध आणि त्या औषधी गुणधर्मांमुळे, जगभरात देखील याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. एक किलो लाकूड भारतात साधारणपणे १५ हजारांना आणि परदेशात ३ हजारांना विकले जात आहे.  Video : पाठवणीनंतर रड रड रडली अन् निघाला मेकअप; खरं रूप दिसताच नवऱ्यानं केलं असं काही

Web Title: Farmer did sandalwood farming in rajasthan took training from internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.