बापरे! कधीही पाहिली नसेल दोन वाघांमधील 'अशी' लढाई; पाहा थरारक व्हिडीओ

By manali.bagul | Published: December 6, 2020 04:01 PM2020-12-06T16:01:33+5:302020-12-06T16:10:06+5:30

Treading Viral News in Marathi : दोन वाघांमधील अशी लढाई तुम्ही याआधी कधीही पाहिली नसेल. वाईल्ड लेन्स या ट्विटर युजरने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Tigers territorial fight video goes viral from ranthambhore | बापरे! कधीही पाहिली नसेल दोन वाघांमधील 'अशी' लढाई; पाहा थरारक व्हिडीओ

बापरे! कधीही पाहिली नसेल दोन वाघांमधील 'अशी' लढाई; पाहा थरारक व्हिडीओ

Next

सोशल मीडियावर वन्य प्राण्यांचे वेगवेगळे व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत असतात. वाघ, बिबट्या, चित्ता यांच्या शिकारीचे किंवा लढाईचे अनेक व्हिडीओ तुम्ही आतापर्यंत पाहिले असतील. कधी शिकारावरून तर कधी वाघिणीवरून दोन वाघांमध्ये झालेल्या लढाईचे अनेक व्हिडीओ पाहायला मिळाले. आता सोशल मीडियावर दोन वाघांमधल्या लढाईचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दोन वाघांमधील अशी लढाई तुम्ही याआधी कधीही पाहिली नसेल. वाईल्ड लेन्स या ट्विटर युजरने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या व्हिडीओमध्ये आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी टॅग केलं आहे. वाई माधोपूरच्या रणथंभोर राष्ट्रीय उद्यानात दोन वाघांमधील लढाईचा एक थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.  या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता दोन्ही वाघ खूप आक्रमक झाले आहेत. एकमेकांच्या तोंडावर पंजे मारून ही लढाई सुरू होते.

हे दोघंही हार मानत नाहीत तर एकमेकांवर तुटून पडतात. १५ सेकंदाच्या लढाईचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. आतापर्यंत ४ हजारापेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून ३०० पेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. 

नदीवर पाणी पिण्यासाठी आला चित्ता, काही सेकंदात मगरीने झडप घातली 

आता सोशल मीडियावर एका तहानलेल्या चित्त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. कारण तहानलेल्या चित्त्याला काही सेकंदात आपला जीव गमवावा लागला आहे.  हा व्हिडीओ सोशल मीडिया युजर संकेत बडोला यांनी शेअर केला होता. या व्हिडीओला कॅप्शन दिलं आहे की, ६० सेंकदात गेला. शिकारी स्वतःचं शिकार झाला. हा  जंगलाचा नियम आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू  शकता. पापी पित असलेल्या चित्त्याला काही कळायच्या आतच मगरीने खाऊन फस्त केलं आहे.

Web Title: Tigers territorial fight video goes viral from ranthambhore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.