Factory busted washing and reselling used condoms in Vietnam | धक्कादायक! वापरलेले कंडोम केवळ पाण्याने धुवून बनवत होते नवीन, फॅक्टरीवर धाड टाकून भांडाफोड....

धक्कादायक! वापरलेले कंडोम केवळ पाण्याने धुवून बनवत होते नवीन, फॅक्टरीवर धाड टाकून भांडाफोड....

गर्भधारणा टाळण्यासाठी, सुरक्षित लैंगिक संबंधासाठी आणि लैंगिक आजार टाळण्यासाठी कंडोम किती महत्वाचा असतो हे सर्वांनाच माहीत आहे. कंडोमचं महत्व लोकांना आता कुठे थोडं कळायला लागलं आहे. पण याचं मार्केट वाढत असताना याचं ब्लॅक मार्केटींगही अधिक होताना दिसतं. व्हिएतनामच्या एका फॅक्टरीवर धाड टाकल्यावर अधिकाऱ्यांना जे दिसलं ते पाहून तर सगळेच हैराण झाले. कारण इथे वापरलेले कंडोम्स पुन्हा स्वच्छ करून पॅकेटमध्ये पॅक केले जात होते.

न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी शनिवारी येथील एका फॅक्टरीवर धाड टाकली. इथे त्यांना ३ लाख २० हजार वापरलेले कंडोम आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी ही फॅक्टरी सील केली. इथे सापडलेले एकूण ३ लाख २४ हजार कंडोम ताब्यात घेण्यात आले आहेत.

तपासातून समोर आले की, काही लोक रस्त्यांवर पडलेले वापरलेले कंडोम्स जमा करत होते. ते धुवून आणि सुकवून पुन्हा पॅकेटमध्ये पॅक करत होते. नंतर हे कंडोम पुन्हा मार्केटमध्ये विकण्यासाठी पाठवले जात होते. धक्कादायक बाब म्हणजे हे कंडोम फक्त पाण्याने धुवून त्यांना पुन्हा शेप दिला जात होता. नंतर पॅक केले जात होते.

सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले की, गुन्हेगारांवर लवकरच कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, कंडोम हे केवळ एकदा वापरण्यासाठी तयार केले जात असतात. पुन्हा त्याचाच वापर करून इन्फेक्शनचा धोका असतो. अशात लोकांच्या आरोग्यासोबत अशाप्रकारे खेळणं कंपनीच्या मालकाला चांगलंच महागात पडणार आहे. स्थानिक लोकांमध्ये या प्रकरणावरून चांगलाच संताप आहे. कारण आतापर्यंत या फॅक्टरीमधून हजारो कंडोम्स मार्केटमध्ये पोहोचले आहेत. 

हे पण वाचा :

लग्न करा अन् मिळवा साडेचार लाख रुपये; ‘या’ देशाच्या सरकारचा अनोखा निर्णय

बोंबला! गर्लफ्रेन्डच्या घोरण्याने तो झाला होता हैराण, 'ही' विचित्र ट्रिक वापरून केला तिचा आवाज बंद!

बाबो! नागिणीसाठी आपसात भिडले दोन नाग, पण दोघांच्या भांडणात नागीण पसार...

Web Title: Factory busted washing and reselling used condoms in Vietnam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.