लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच विधवा होतात किन्नर, तरीही लग्न का करतात?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 16:05 IST2025-02-22T16:05:16+5:302025-02-22T16:05:43+5:30
अशी मान्यता आहे की, किन्नरांनी दिलेला आशीर्वाद तुमचं नशीब बदलवू शकतो. किन्नर लोक एकीनं राहतात आणि त्यांच्यासारख्या इतरांचं स्वागत करतात.

लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच विधवा होतात किन्नर, तरीही लग्न का करतात?
Viral News : किन्नर सुद्धा इतर सामान्य लोकांप्रमाणेच मनुष्य असतात. मात्र, समाजातीलच लोक त्यांच्याकडे वेगळ्या दृष्टीकोनातून बघतात. किन्नर लोकांचं जगणं इतर लोकांपेक्षा वेगळं असतं. नैसर्गिकरित्या त्यांचं शरीर जरा वेगळं असतं. पण शेवटी ते मनुष्यच आहेत. समाज त्यांना स्वीकारत नसला तरी ते त्यांच्या त्यांच्या विश्वास आनंदी जगण्याचा प्रयत्न करत असतात. अशी मान्यता आहे की, किन्नरांनी दिलेला आशीर्वाद तुमचं नशीब बदलवू शकतो. किन्नर लोक एकीनं राहतात आणि त्यांच्यासारख्या इतरांचं स्वागत करतात.
देवासोबत लग्न आणि विधवा होण्याची परंपरा
लोकांना वाटतं की, किन्नर लग्न करत नाहीत. पण असं नाहीये. ते लग्न करतात, पण केवळ एका दिवसासाठी. किन्नर अर्जुन आणि नाग कन्या उलूपीचा पुत्र इरावनसोबत लग्न करतात. यादरम्यान ते मोठा उत्सव साजरा करतात आणि नाच-गाणंही करतात. या विवाहानंतर इरावन देवाची मूर्ती तोडली जाते. ज्यानंतर किन्नरांना विधवा मानलं जातं. त्यानंतर ते हिंदू-रितीरिवाजानुसार विधवेची वस्त्र धारण करतात आणि एक सामान्य जीवन जगू लागतात.
महाभारताशी निगडीत परंपरा
किन्नरांच्या या विवाह परंपरेची मुळं महाभारत काळाशी जुळलेली आहेत. कथेनुसार, महाभारत युद्धाआधी पांडवांनी मां कालीची पूजा केली. ज्यात एका अटीनुसार, एका राजकुमाराचा बळी द्यायचा होता. मात्र, बळी देण्यासाठी कुणीही समोर येत नव्हतं. पण इरावन स्वेच्छेनं बळी जाण्यास तयार झाला.
मात्र, त्यानं एक अट ठेवली की, बळी देण्याआधी त्याचं लग्न लावून देण्यात यावं. त्याच्या या मागणीमुळं पांडव अडचणीत सापडले. कारण प्रश्न हा होता की, कोणतीही राजकुमारी एका दिवसासाठी लग्नास कशी तयार होईल?
श्रीकृष्णानं मोहिनीच्या रूपात केलं लग्न
ही समस्या दूर करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण समोर आले. त्यांनी मोहिनीचं रूप घेतलं आणि इरावनसोबत विवाह केला. त्याची शेवटची इच्छा पूर्ण झाली. दुसऱ्या दिवशी जेव्हा इरावनचा बळी देण्यात आला, तेव्हा मोहिनी रूपी श्रीकृष्ण विधवा झाले. त्यानंतर सगळ्या रितीरिवाजांचं पालन करत शोक व्यक्त केला. याच घटनेच्या आठवणीत किन्नर समाज इरावनला आपला देवता मानतात आणि दर वर्षातील एका दिवसाठी त्याच्यासोबत लग्न करतात, दुसऱ्या दिवशी विधवेचे रितीरिवाज पार पाडले जातात.