शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
5
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
6
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
7
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
8
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
9
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
10
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
11
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
12
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
13
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
14
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
15
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
16
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
17
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
18
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
19
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
20
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?

अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 21:03 IST

जेव्हाही जगातील सर्वात सुरक्षित इमारतींबद्दल अथवा घरांबद्दल चर्चा होते, तेव्हा 'डॉक्टर हूची हवेली' (Doctor Who's Mansion) हे नाव देखील चर्चेत येते.

इराण आणि इस्रायल यांच्यात भीषण युद्ध सुरू होते, दोन्ही देश एकमेकांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ले करत होते. जरी युद्धविराम झाला असला तरी, तणाव अजूनही कायम आहे. या युद्धादरम्यान अशी भीती व्यक्त केली जात होती की, जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे आणि ते कधीही सुरू होऊ शकते. अशा परिस्थितीत, जर महायुद्ध सुरू झाले तर लोक स्वतःचा बचाव कसा करतील, असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. कारण, आधुनिक शस्त्रे कोणत्याही लक्ष्याला भेदून ते उद्ध्वस्त करू शकतात. मात्र, या सगळ्यातही एक असे घर आहे, जे या जगातील सगळ्यात सुरक्षित घर मानले जाते.  

जगातील सर्वात सुरक्षित इमारत, 'डॉक्टर हूची हवेली'!जेव्हाही जगातील सर्वात सुरक्षित इमारतींबद्दल अथवा घरांबद्दल चर्चा होते, तेव्हा 'डॉक्टर हूची हवेली' (Doctor Who's Mansion) हे नाव देखील चर्चेत येते. असे म्हटले जाते की, कोणत्याही युद्धकाळात ही इमारत नेहमी पूर्णपणे सुरक्षित राहील. २०१६ मध्ये बीबीसीने दिलेल्या रिपोर्टनुसार, ही इमारत ब्रिटिश ग्रामीण भागात आहे, जी कधीकाळी 'डॉक्टर हू' या मालिकेच्या चित्रीकरणासाठी वापरली गेली होती. गंभीर हल्ल्यांच्या स्थितीत बचावासाठी या इमारतीचा वापर केला जाऊ शकतो.

कोणाची आहे ही इमारत?मीडिया रिपोर्ट्सनुसार, वुड नॉर्टन हॉल (Wood Norton Hall) असे या बंगल्याचे नाव असून, ते वॉरसेस्टरशायरच्या जंगलांमध्ये वसलेले आहे. दुसऱ्या महायुद्धापूर्वी बीबीसीने हे घर खरेदी केले होते. ब्रिटनवर हल्ले झाल्यास लंडन आणि इतर संवेदनशील शहरांपासून सुरक्षित अंतरावर एक बॅकअप प्रसारण केंद्र म्हणून काम करण्यासाठी बीबीसीने ही मालमत्ता ताब्यात घेतली होती.

अणुहल्ला झेलण्यास सक्षम!१९६० च्या दशकात ही इमारत अणुहल्ला झेलला जाईल इतकी सक्षम बनवण्यात आली. तिला एक मजबूत संरक्षणात्मक भागात रूपांतरित करण्यात आले, ज्याला वुड नॉर्टन प्रोटेक्टेड एरिया (Wood Norton Protected Area) असे नाव देण्यात आले. यानंतर, अणुयुद्धाच्या परिस्थितीत युद्धकाळात प्रसारण सेवा सुरू ठेवण्यासाठी तयार केलेल्या ११ संरक्षित सुविधांमध्ये या इमारतीचा समावेश झाला. नॉर्टन फॉरेस्टमध्ये असलेली ही किल्ल्यासारखी हवेली तिसऱ्या महायुद्धासारख्या परिस्थितीत अणुहल्ला सहन करू शकते.

टॅग्स :warयुद्धIranइराणIsraelइस्रायल