चंद्रावर कबर असलेली एकुलती एक व्यक्ती Eugene Shoemaker, जाणून घ्या का त्यांची कबर तिथे आहे
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2021 16:31 IST2021-09-30T16:25:31+5:302021-09-30T16:31:46+5:30
या व्यक्तीचं नाव आहे Eugene Shoemaker, जो अमेरिकेत राहणारा एक वैज्ञानिक होता. त्याना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉकर बुश यांनी सायन्सच्या नॅशनल मेडलने सन्मानित केलं होतं.

चंद्रावर कबर असलेली एकुलती एक व्यक्ती Eugene Shoemaker, जाणून घ्या का त्यांची कबर तिथे आहे
चंद्रावर आतापर्यंत १२ लोकांनी मूनवॉक केला आहे. Neil Armstrong हा चंदावर पाउल ठेवणारा पहिला व्यक्ती होता. त्यानंतर बरेच जण चंद्रावर गेले. मात्र, एक व्यक्ती अशीही आहे जो चंद्रावर कधी गेला तर नाही, पण त्याची कबर मात्र चंद्रावर आहे.
चंद्रावर जायचं होतं स्वप्न
या व्यक्तीचं नाव आहे Eugene Shoemaker, जो अमेरिकेत राहणारा एक वैज्ञानिक होता. त्याना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉकर बुश यांनी सायन्सच्या नॅशनल मेडलने सन्मानित केलं होतं. भूगोलाबाबत त्यांची माहिती अद्बूत होती. ते चंद्रावर जाण्याचं स्वप्न बघत होते. यासाठी त्यांनी नासाची टेस्टही दिल होती. पण आरोग्याच्या काही कारणांमुळे ते फेल झाले.
अपघातात झाला होता मृत्यू
Shoemaker यांनी चंद्रावरील अनेक खड्डे, घाट आणि डोंगरांचा शोध लावून त्यांचं नामकरण केलं होतं. त्यांनी अंतराळात असलेल्या अनेक धुमकेतूंचा शोध लावून त्यांची माहिती लोकांसमोर आणली होती. त्यामुळे त्यांचं नावही एक धुमकेतूला देण्यात आलं होतं. १९९७ मध्ये ते एका धुमकेतूच्या शोधात जात होते. तेव्हाच त्यांच्या कारचा अपघात झाला. ज्यात त्यांचा मृत्यू झाला.
चंद्रावर पाठवल्या अस्थी
त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी त्यांच्या एका जुन्या विद्यार्थ्याने त्यांच्या अस्थी चंद्रावर पोहोचवण्यासाठी नासाला संपर्क केला होता. ते यासाठी तयारही झाले आणि १९९८ मध्ये आपल्या Lunar Prospector मिशनच्या माध्यमातून त्यांनी Eugene Shoemaker यांच्या अस्थी चंद्रावर दफन केल्या. अशाप्रकारे ते पहिले आणि अखेरचे व्यक्ती बनले ज्यांची कबर चंद्रावर आहे.