शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रावर कबर असलेला एकुलता एक माणूस, जाणून घ्या कोण आहे तो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2023 13:38 IST

चंद्राबाबत एक अशीही माहिती आहे जी तुम्हालाही माहीत नसणार. असे अनेक महान वैज्ञानिक झाले ज्यांनी त्यांच्या संशोधनातून मानवी जीवनासाठी आणि विज्ञानासाठी मोठं योगदान दिलं.

सध्या भारताने पाठवलेला चांद्रयान हा जगभरातील विषय झाला आहे. चंद्राबाबत बरीच माहिती या यानाद्वारे आपल्याला मिळणार. पण चंद्राबाबत एक अशीही माहिती आहे जी तुम्हालाही माहीत नसणार. 

असे अनेक महान वैज्ञानिक झाले ज्यांनी त्यांच्या संशोधनातून मानवी जीवनासाठी आणि विज्ञानासाठी मोठं योगदान दिलं. त्यांचं काम पुढील अनेक शतके लक्षात ठेवलं जाईल. यातीलच काही वैज्ञानिकांपैकी एक होते यूजीन मर्ले शूमेकर.

यूजीन शूमेकर यांनी कित्येक अंतराळवीरांना प्रशिक्षित केलं. २० एप्रिल १९२८ मध्ये जन्मलेले यूजीन २०व्या शतकातील महान वैज्ञानिकांपैकी एक होते. त्यांच्या योगदानासाठी त्यांना अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज, एच डब्ल्यू बुश यांनी विज्ञानाच्या राष्ट्रीय पदकाने सन्मानित केले होते.

यूजीन यांना एरिजोनामध्ये बॅरिंजर मेटिओर क्रेटर(उल्का पिंडाचा खड्डा)च्या संशोधनासाठीही ओळखलं जात होतं. त्यासोबतच ते संयुक्त राज्य भूवैज्ञानिक सर्व्हेक्षणचे खगोल भूविज्ञान अनुसंधान कार्यक्रमाचे पहिले निर्देशकही होते. त्यांचं पहिलं मिशन यूटा आणि कोलोराडोमध्ये यूरेनियमचा भांडार शोधणं हे होतं.

त्यानंतर  त्यांचं दुसरं मिशन हे ज्वालामुखीच्या प्रक्रियांचा अभ्यास करणं हे होतं.यूजीन यांनी पृथ्वीवरून चंद्राबाबत भरपूर अभ्यास केला. ते नेहमी एका अंतराळ यानात बसण्याचं आणि चंद्रावर चालण्याचं स्वप्न बघत होते. पण त्यांना हे स्वप्न पूर्ण करण्याची कधी संधीच मिळाली नाही.

एका गंभीर आजारामुळे त्यांचं अंतराळवीर होण्याचं स्वप्न अर्धवट राहिलं. पण नासाने १९९७ मध्ये त्यांच्या निधनानंतर त्यांचं स्वप्न पूर्ण केलं. नासाने त्यांच्या अस्थी चंद्रावर दफन केल्या. हा मान मिळवणारे ते जगातले एकुलते एक व्यक्ती आहेत.

यूजीन शूमेकर यांचं निधन १९९७ मध्ये एका कार अपघातात झालं होतं. या दुर्घटनेत त्यांची पत्नी कॅरोलीन जीन स्पेलमॅन शूमेकर गंभीर जखमी झाल्या होत्या. त्या सुद्धा एक वैज्ञानिक आहेत. आता त्यांचं ९० वर्षे आहे.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके