शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : मतदानानंतर सुप्रिया सुळे थेट अजित पवारांच्या घरी दाखल
3
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
4
"भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
5
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
6
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
7
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
8
"वडील गेल्यापासून आई गेली १२ वर्ष...", विलासराव देशमुखांच्या आठवणीत रितेश देशमुख भावुक
9
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
10
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
11
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
12
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
13
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
14
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
15
१०० वर्षांनी वृषभेत चतुर्ग्रही योग: ५ राशींना वरदान काळ, बंपर फायदा; सुवर्ण संधी, अपार लाभ!
16
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
17
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
19
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
20
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण

आश्चर्यजनक! शारीरिक संबंधांमुळे नष्ट झाली होमो सेपियंसची एक अख्खी प्रजाती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2021 11:30 AM

Humans and Neanderthal: शास्त्रज्ञांनी शोधले निअँडरथल म्हणजेच होमो सेपियंसची प्रजाती नष्ट होण्यामागचे कारण

नवी दिल्‍ली: शास्त्रज्ञांनी निअँडरथल(Neanderthal) म्हणजेच होमो सेपियंसची लोकसंख्या कमी होण्यामागचं महत्त्वाचं कारण शोधलं आहे. त्यांच्या मते, मानव आणि निअँडरथल यांच्यातील शारीरिक संबंधांमुळे एक दुर्मिळ प्रकारच्या रक्त विकाराने निअँडरथलच्या संततीवर नकारात्मक परिणाम झाला, ज्यामुळे त्यांची लोकसंख्या कमी झाली.

पीएलओएस वन जर्नलमध्ये प्रकाशित अभ्यासानुसार, निअँडरथल्सच्या रक्ताच्या नमुन्यांमधून असे दिसून आले की त्यांच्या रक्तात अनुवांशिक प्रकारांचा एक विशिष्ट संच आहे, ज्यामुळे ते गर्भ आणि नवजात (एचडीएफएन) रोगांच्या हेमोलाइटिक रोगांसाठी असंवेदनाशील होते. त्यामुळेच निअँडरथलमध्ये अशक्तपणा निर्माण होऊन त्यांचा नाश झाल्याची शक्यता आहे.

या आजाराने कमी झाली लोकसंख्याHDFN मुळे निअँदरथलच्या मुलांची संख्या कमी झाली असण्याची शक्यता आहे, असे संशोधकांचे मत आहे. निअँडरथल मानव हे होमो सेपियन्सचे विलुप्त सदस्य आहेत जे लाखो वर्षांपूर्वी पश्चिम युरोप, पश्चिम आशिया आणि आफ्रिकेत राहत होते. त्यांना मानवाची उपजाती मानली जाते. त्याची उंची सुमारे 4.5 ते 5.5 फूट होती. 2007 मध्ये केलेल्या अभ्यासानुसार त्यांच्या केसांचा रंग लाल आणि त्वचेचा पिवळा होता.

रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, निअँडरथल्स आणि डेनिसोव्हन्सच्या रक्तगट प्रणालींच्या विश्लेषणातून त्यांचे मूळ, व्याप्ती आणि होमो सेपियन्सशी असलेले संबंध समजून घेण्यात मोठी मदत झाली आहे. मानवाचे पूर्वज आणि निअँडरथलमधील संबंधांमध्ये एचडीएफएन असल्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळेच या आजारामुळेच त्यांच्यात एनीमिया झाला आणि निअँडरथलची प्रजाती कमजोर होऊन नष्ट झाली.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके