शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

विनापैसे देशभर फिरल्याचा या विद्यार्थ्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2017 14:58 IST

या अवलियाने भारत देशातल्या ११ राज्यात फुकटात प्रवास केल्याचा दावा केलाय.

ठळक मुद्देआपल्याला साधं नाक्यावर जायचं असेल तरी खिशातले १० रुपये खर्च होतात.मग हा अवलिया फुकटात कसं काय ११ राज्य फिरला असेल बरं?या प्रवासादरम्यान त्याला सोशल मीडियानेही बरीच मदत केली आहे.

अनंतपुर : गेल्या काही वर्षात ट्रॅव्हल अॅण्ड टुरिझमला फार महत्व आलं आहे. मोठं-मोठे पॅकेज दाखवून आपल्याला देशभर, जगभर फिरवण्याची आमिषं दाखवली जातात. यातूनच कितीतर ट्रॅव्हलर ब्लॉगरही तयार झाले आहेत. त्यांना फिरण्यासाठीच पैसे दिले जातात. पण तुम्हाला कोणी सांगितलं की एक रुपयाही खर्च न करता देश फिरता येतो तर तुम्हाला आश्चर्य वाटेल ना?  

या एका अवलियाचं म्हणणं आहे की त्याने एक रुपयाही खर्च न करता देश पिंजून काढलाय. आश्चर्य वाटलं ना? त्याने हा फुकटाचा प्रवास कसा मॅनेज केलाय याविषयी आपण जाणून घेऊया. 

विमल गिथानंदन असं या जिप्सीचं नाव आहे. अनंतपूर येथील जेएनटीयूमधून इंजिनिअरचा ड्रॉप आऊट असलेला विमल म्हणतो की, ‘इंजिनिअरींग करताना मला फार एकटं एकटं वाटायला लागलं. आजूबाजूला माणसं असली तरी माझा एकटेपणा दूर होत नव्हता. तेव्हा मी जोरजोरात रडत असे. म्हणून या त्रासातून बाहेर पडण्यासाठी मी भटकंती करायची ठरवी. प्रवासात आपण कोण आहोत कसे आहोत याची आपल्यालाच नव्याने ओळख पटते. म्हणून मी एकट्यानेच प्रवास करायचं ठरवलं.’

आतापर्यंत त्याने ११ राज्यात फेरफटका मारलाय. तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, महाराष्ट्र, गोवा, आसाम, मेघालय, नागालँड आणि वेस्ट बेंगाल अशा ठिकाणी त्याने एकही रुपया खर्च न करता प्रवास केल्याचं तो सांगतो. सगळ्यात प्रथम अनंतपूर ते बेंगलोर असा प्रवास केला. त्यावेळी त्याने संपूर्ण दक्षिण भारत पिंजून काढला. मग त्याने महाराष्ट्र, आसाम, मेघालय, नागालँड असा प्रवास केला. 

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपल्याला साधं नाक्यावर जायचं असेल तरी खिशातले १० रुपये खर्च होतात मग हा अवलिया फुकटात कसं काय ११ राज्य फिरेल? त्यावर त्याने असा दावा केलाय की, प्रवासासाठी त्याने इतरांकडून मदत मागितली. कार, ट्रक, बाईकवर त्याने लिफ्ट घेतली. प्रत्येकवेळी त्या चालकांसोबत त्याने सेल्फीही काढला. त्यांची संपूर्ण माहितीही घेतली. जेणेकरून त्यांच्या संपर्कात राहता येईल. असाच एक प्रसंग सांगताना तो म्हणाला की, ‘रमझानच्या काळात अनंतपूर ते बेंगळुरू असा प्रवास करत असताना एक ट्रकचालक भेटला. तो ट्रकचालक पत्रकारही होता. त्याच्या प्रवासादरम्यान एखादा अपघात घडला की तो चालक वर्तमानपत्रात बातम्या देत असत. मला माझ्या इच्छुक स्थळी त्याने मला सोडलंच शिवाय मला खायलाही दिलं. मी उपाशी आहे समजल्यावर त्याने स्वत: हॉटेलमधून जेवण मागवलं. माझं सुदैव असं की मला प्रत्येकवेळी अशीच माणसं भेटत गेली. ’

‘या सगळ्या प्रवासात मी सर्व वाहतूक व्यवस्थेचा वापर केला आहे. ट्रेन, बस यांचाही वापर केला. पण माझ्या सहप्रवाशांनी मला मदत केली त्यामुळे मी मला वाटेल तेवढा प्रवास करू शकलो,’ असंही तो पुढे म्हणाला. 

या प्रवासादरम्यान त्याला सोशल मीडियानेही बरीच मदत केली आहे. तो ज्याठिकाणी असायचा त्या ठिकाणचं लोकेशन तो सोशल मीडियावर शेअर करायचा. त्यानुसार अनेकांनी त्याला मदत केली आहे. केरळमधील प्रवासही त्याच्यासाठी महत्त्वाचा ठरला. तेथे गेल्यावर त्याला पुन्हा माणुसकी असल्याचं जिवंत उदाहरण सापडलं.  कारण एका गरीब कुटुंबाने त्याला  फार मदत केली. त्याला जेवण आणि राहण्यासाठी तर जागा दिलीच पण झोपण्यासाठी त्यांनी त्यांची चादर देऊन स्वत: मात्र जमिनीवर झोपले. ते कुटूंब गरीब होतं, त्यांच्याकडे फार सामान नव्हतं. पण विमल एक पर्यटक असल्याने त्याची गैरसोय होऊ नये यासाठी त्यांनी स्वत: जमिनीवर झोपून विमलला त्यांची चादर देऊ केली. 

या संपूर्ण प्रवासात ज्यांनी ज्यांनी त्याला मदत केली आहे त्यांच्यासाठी तो ‘गिव्हिंग बॅक’ नावाचा उपक्रम राबवणार आहे. प्रवासादरम्यान मदत करणाऱ्या प्रत्येकाला तो आपल्या घरी बोलावून त्यांचं आदरतिथ्य करण्याचा त्याचा मानस आहे. या लोकांमुळे त्याला माणसांमध्ये माणुसकी आहे याचा प्रत्यय आला असंही तो म्हणतो. 

तो म्हणतो की, ‘मी माझ्या भविष्याचा,करिअरचा केव्हाच विचार करत नाही. आयुष्य आहे तसं जगत गेल्याने प्रत्येक क्षण जगता येतो. भविष्याचा विचार करण्याच्या नादात आपण आजचा क्षण हरवून बसतो. आता त्याला एक सामाजिक संस्था काढायची आहे. ही संस्था शरीरविक्री करणाऱ्या स्त्रियांसाठी असेल. एका रेड-लाईट विभागात तो फिरत असताना त्याला वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांविषयी फार दया आली. त्यांना ज्यापद्धतीने या क्षेत्रात ओढलं जातं, त्यांच्यावर ज्याप्रकारे अन्याय होतात त्यावर वाचा फोडण्यासाठी ही संस्था काम करेल असं तो म्हणतो. 

सौजन्य - thenewsminute.com

टॅग्स :Travelप्रवासChennaiचेन्नईIndiaभारतStudentविद्यार्थी