Video : रस्त्याच्या मधोमध उभा होता हत्ती, त्याचा चकवण्याचा प्रयत्न फसला अन् बाईकसह समोरच जाऊन पडला...  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 01:21 PM2021-05-17T13:21:13+5:302021-05-17T13:21:30+5:30

सोशल मीडियावर एका हत्तीचा फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे.

Elephant was standing on the middle road person fell with the bike see viral video | Video : रस्त्याच्या मधोमध उभा होता हत्ती, त्याचा चकवण्याचा प्रयत्न फसला अन् बाईकसह समोरच जाऊन पडला...  

Video : रस्त्याच्या मधोमध उभा होता हत्ती, त्याचा चकवण्याचा प्रयत्न फसला अन् बाईकसह समोरच जाऊन पडला...  

Next

सोशल मीडियावर एका हत्तीचा फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे. एक व्यक्ति हत्तीपासून वाचण्याच्या प्रयत्नात बाईकसह त्याच्या समोरच पडला. अपघाताचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही आश्चर्यचकीत व्हाल. एका हस्ती रस्त्याच्या मधोमध उभा आहे आणि तो रस्ता ओलांडण्याची प्रतीक्षा करताना लोकं दिसत आहेत. पण, अशात एक व्यक्ती सुसाट वेगानं हत्तीच्या समोरून जातो, पण पुढे जाऊन तो बाईकसह पडतो. वन अधिकारी प्रवीण कासवान ( IFS Officer Parveen Kaswan) यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. 

या व्हिडीओत हत्ती रस्त्यावर उभा असलेला दिसत आहे. तेव्हा मागून एक व्यक्ती बाईकवरून त्याच्याजवळून निघतेल. पण, थोडा पुढे जाताच त्याची बाईक स्लीप झाली अन् तो पडला. आता एवढ्यामोठ्या हत्तीसमोर पडल्यानंतर काय होईल, याची भीती त्याला नक्की सतावली असेल आणि घाबरत घाबरत तो कसाबसा उठला. प्रवीण कासवान यांनी लिहिले की, हा हत्ती यावेळी काय विचार करत असेल, याचा अंदाज लावा


१७ मे रोजी शेअर केलेल्या या व्हिडीओला काही तासांत १४ हजारहून अधिक व्ह्यूज मिळाले. शिवाय अनेकांनी भन्नाट प्रतिक्रियाही दिल्यात.



 

Web Title: Elephant was standing on the middle road person fell with the bike see viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.